Raju Shetty On Pm Narendra Modi: वा! असा तत्पर चौकीदार मिळायला नशिब लागत, असा खोचक टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना लगावला आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तब्बल 2 महिने 6 दिवसांनी केंद्रीय पथक आल्यानंतर राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आपल्या ट्विटर हँडलवरून तोफ डागली आहे.
राजू शेट्टी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'वा ! असा तत्पर चौकीदार मिळायला नशिब लागत. 2 महिने 6 दिवसानी अतिवृष्टीचे झालेले नुकसान पाहण्यास केंद्रीय पथक आले आहे. आता शिवारात जाऊन काय बघणार ? शेतकऱ्यांनी खासगी सावकराकडून पैसे घेऊन जमीनीची साफ सफाई करून हरभरा ज्वारीची पेरणी केली आहे. या पिकाकडे बघून पथक म्हणेल “फसल तो बहुत अच्छी है “ इनको मदत करने कि जरूरत नही.' (हेही वाचा - Bhagirath Bharat Bhalke: भगिरथ भारत भालके यांची श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना चेअरमनपदी निवड, शरद पवार यांचा शब्द ठरला अंतिम)
2 महिने 6 दिवसानी अतिवृष्टीचे झालेले नुकसान पाहण्यास केंद्रीय पथक आले आहे.
आता शिवारात जाऊन काय बघणार ?
शेतकर्यांनी खासगी सावकराकडून पैसे घेऊन जमीनीची साफ सफाई करून हरभरा ज्वारीची पेरणी केली आहे. या पिकाकडे बघून पथक म्हणेल “फसल तो बहुत अच्छी है “ इनको मदत करने कि जरूरत नही.
— Raju Shetti (@rajushetti) December 21, 2020
यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे राज्य सरकारने केंद्र सरकारकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी करण्यासाठी पथक पाठवण्याची विनंती केली होती. परंतु, त्यावेळी केंद्राने राज्यात कोणतही पथक पाठवलं नाही. त्यानंतर तब्बल 2 महिन्यानंतर नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राने पथक पाठवलं. त्यामुळे राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.