नाशिक:  देवळाली रेल्वेस्थानक उडवू देऊ या निनावीपत्रानंतर आज  संशयास्पद बॅग सापडल्याने खळबळ
Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

नाशिक (Nashik)  येथील देवळाली रेल्वेस्थानक (Devrali Railway Station) उडवून देऊ असं निनावी पत्र काल पोलिस आयुक्तालयाला मिळालं होतं. तेव्हापासूनच भीती व्यक्त केली जात होती. आज देवळाली स्टेशनसमोर आर्मी रेस्टॉरंटमध्ये एक संशयास्पद बॅग़ सापडली ही भीती वाढली होती. मात्र पुरेशी तपासणी केल्यानंतर असून या बॅगेमध्ये काहीच न सापडल्याने सुरक्षा यंत्रणेने सुटकेचा निश्वास सोडला आहे. मुंबई: विरार डी-मार्ट येथे पोलिकसांकडून मॉक ड्रील, दहशतवादी पकडल्याची नागरिकांमध्ये चर्चा (व्हिडिओ)

तासभर बॉम्ब निकामी करणारं पथक, श्वान पथक देवळाली परिसरात दाखल करण्यात आलं होतं. संशयास्पद बॅग उघडल्यानंतर त्यामध्ये केवळ काही कपडे, कागदपत्र सापडली आहेत. पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये देशातील महत्त्वपूर्ण ठिकाणं, तीर्थक्षेत्र येथील सुरक्षा व्यवस्था अधिक सुसज्ज करण्यात आली आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभर शोक आणि रोषाची भावना आहे. दरम्यान सध्या पिंगलान या पुलवामा येथील भागात भारतीय जवान आणि दहशतवादी यांच्यामध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत 4 भारतीय जवान आणि दोन दहशतवादी ठार झाले आहेत. सध्या ही चकमक अद्यापही सुरू आहे.