Pulwama Terror Attack: जम्मू काश्मीर (Jammu and Kashmir) येथील पुलवामा (Pulwama ) जिल्ह्यात सीआरपीएफ (CRPF) जवानांच्या तुकडीवर दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर देशभरातील अनेक ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आला. देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख असलेल्या मुंबईमध्येही सावधानतेचा इशारा मिळाला. आगोदर कर्तव्यतत्पर असलेले मुंबई पोलीस (Mumbai Police) या हल्ल्यामुळे अधिकच सतर्क झाले. शहरात जर काही अनुचित प्रकार घडला तर, परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठीची पूर्व तयारी म्हणून मुंबई पोलिसांनी काउंटर-मॉक ड्रिल (Counter-Terror Mock Drill) केले. विरार येथील डी-मार्ट (Virar D Mart) येथे करण्यात आलेल्या या मॉक ड्रीलचा व्हिडिओ सोशळ मीडियात व्हायरल झाला आहे.
साधारण तीन तास चाललेले मॉक ड्रील आणि त्याचा व्हायरल झालेला व्हिडिओ यांमुळे पुणे आणि मुंबईतील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर अशा सोशल मीडियांमधून लोक एक दहशतवादी पकडल्याची खोटी माहिती शेअर करत आहेत. त्यासोबत एक व्हिडिओशी शेअर केला जात आहे. ज्यात मुंबई पोलिसांनी एका व्यक्तिला पकडले आहे. पोलिसांचा मोठा ताफा आहे. काही पोलिस पकडलेल्या व्यक्तिवर बंदूक रोखून त्याला घेऊन जात आहेत. ते त्याला पोलीसांच्या वाहनात बसवत असल्याचे पहायला मिळते. याच व्हिडिओत एक आवाजही येतो की, एका दहशतवाद्याला पकडले आहे. त्याच्याकडून दोन बंदूकही ताब्यात घेण्यात आल्या आहेत. परंतू, हा व्हिडिओ विरार येथील DMart येथे केलेल्या मॉक ड्रिलचा आहे. हा व्हिडिओ पोलिसांनी नव्हे तर, मॉक ड्रिल पाहण्यास उपस्थित असलेल्या काही लोकांनी तो शूट केल्याचे समजते. (हेही वाचा, Pulawama Terror Attack: 'आम्ही ना विसरणार, ना माफ करणार', CRPF ची शहिदांना श्रद्धांजली)
Terriorrist coming in the d-mart of virar but we salut to our army & police also & save life of many peoples pic.twitter.com/Qp0FUxx3l1
— Nikita (@Nikita68042188) February 15, 2019
Terrorist was caught in Thane district virar while keeping a bomb in dmart. pic.twitter.com/FsqbvpGkSa
— ʌnɹɥp (@dhruv7864) February 15, 2019
प्राप्त माहतीनुसार, या व्हिडिओमागचे सत्य असे की, पालघर जिल्हा पोलिसांकडून रिओट कंटोल पोलीस (RCP) आणि क्विक रिस्पॉन्स टीम (QRC) यांनी DMart येथे संयुक्तरित्या मॉक ड्रिल केले होते. या वळी वर्दीतील पोलिसांनी एका नकली (डमी) दहशतवाद्याला पकडले. व्हिडिओतही हेच पाहायला मिळते. हा व्हिडिओ पूर्णपणे मॉक ड्रिलचा आहे. अशा प्रकारे दहशतवादी पकडल्याची खरी घटना मुंबईत घडली नाही. मुंबई पोलिसांनीही त्याला दुजोरा दिला नाही.