कोल्हापूर: हप्तेखोर पोलिसांना दणका, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख दिले निलंबनाचे आदेश
Maharashtra Police | (PTI photo)

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील गांधीनगर पोलीस ठाणे हद्दीत हप्तेखोरी करणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक (Superintendent Of Police) डॉ. अभिनव देशमुख (Dr.Abhinav Deshmukh) यांनी चांगलाच दणका दिला आहे. या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश डॉ. देशमुख यांनी दिले आहेत. निलंबन (Suspend)करण्यात आलेले दोन्ही पोलीस कर्मचारी हे अवैध व्यवसाय करणाऱ्यांकडून हप्ते गोळा करत असत. त्यांच्याबाबत आलेल्या तक्रारीनंतर पोलीस अधिकक्षकांनी हे आदेश काढले.

प्राप्त माहितीनुसार, नारायण पांडुरंग गावडे आणि महादेव पी. रेपे अशी निलंबीत झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे आहेत. दरम्यान, गावडे आणि रेगे यांच्यासोबतच अमित सुळगावकर या पोलीस कर्मचाऱ्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. राजवाडा पोलीस ठाण्यात आलेल्या विवाहितेची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केल्याचा सुळगावकर यांच्यावर आरोप आहे.

दरम्यान, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी कोल्हापूर पोलीस दलात साफसफाई मोहिम हाती घेतली असल्याचे वृत्त आहे. अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांशी संबंध ठेवणाऱ्या आणि अर्थपूर्ण संबंध बाळगणाऱ्या सुमारे जिल्ह्यातील सुमारे ५० हून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या या मोहिमेंतर्गत करण्यात येणार आहेत. त्याची प्रक्रियाही सुरु झाल्याचे समजते.

निलंबीत करण्यात आलेल्या तीनही पोलीस कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप आहेत. कोल्हापूर शहर तसेच जिल्हा हद्दीतील सर्व अवैध व्यवसाय, मटका अड्डे, क्रिकेट बेटिंग, अवैध मद्यविक्रि, मद्यतस्करी असे सर्व प्रकार रोखणयाचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी दिले दिले होते. मात्र, या आदेशाचे पालन करण्याऐवजी गावडे आणि रेपे या जोडगोळीने थेट क्रिकेट बेटींग करणारेक बुकी आणि संबंधितांना सावध राहण्याचा सल्ला दिला. इतकेच नव्हे तर, त्यांच्याकडून हप्तेही गोळा केले. या प्रकाराची माहिती मिळताच गावडे, रेगे या जोडगोळीची तातडीने बदली पोलीस मुख्यालयात करण्यात आली. त्यानंतर आज (मंगळवार, 1 मे 2019) या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश डॉ. देशमुख यांनी दिले. (हेही वाचा, पुणे: अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाची तक्रार नोंदवून न घेणाऱ्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन)

दरम्यान, पतीने घेतलेले कर्ज फेडून देतो असे अमिष दाखवत तीन सावकरांनी आपला लैंगिक छळ केला आणि त्याची चित्रफीत बनवून ती व्हायरल करण्याची धमकी दिली, अशी तक्रार घेऊन एक विवाहित महिला राजवाडा पोलीस ठाण्यात आली होती. या महिलेची तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याची तक्रार आल्यानंततर डॉ. देशमुख यांनी अमित सुळगावकर या पोलीस कर्मचाऱ्याचेही निलंबन केले.