Ranjit Kasle Beed | (Photo Credit - X)

बीड जिल्ह्यातील निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले (Ranjit Kasle) यांना पोलिसांनी ताब्यात (Ranjit Kasle Detained) घेतले आहे. पुणे (Pune) येथील स्वारगेट परिसरात असलेल्या एका हॉटेलमधून त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त आहे. या कारवाईचा एक व्हिडिओही प्रसारमाध्यामांनी प्रसारित केला आहे. ज्यामध्ये कासले हा पोलिसांसोबत जात असल्याचे पाहायला मिळते. व्यवस्थेविरुद्ध लढणे शक्य नाही. त्यामुळे व्यवस्थेला सामोरे जाण्यासाठी आपण पोलिसांना शरण येणार आहोत. त्यासाठीच आपण पुणे येथे आलो असल्याचे प्रसारमाध्यमांना सांगणाऱ्या कासले यांना शरण येण्याआधिच ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.

रणजित कासले यांच्याकडून धक्कादायक गौप्यस्फोट

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण उघडकीस आले आणि अवघ्याय राज्यात खळबळ उडाली. राज्य सरकारनेही या प्रकरणाची अतिशय उशीरा गंभीर दखल घेतली. या प्रकरणामुळे सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे, त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड अडचणीत आले. मुंडे यांचे पद गेले तर कराड यास अटक झाली. दरम्यान, जिल्ह्यातील प्रशासकिय यंत्रणेवरही बरेच बदल झाले. अनेकांच्या बदल्या झाल्या, अनेक पोलिसांना निलंबीत करण्यात आले. पीआय रणजित कासले हा त्यापैकीच एक आहेत. त्यांचेही निलंबन करण्यात आले. त्यानंतर हे कासले प्रदीर्घ काळ गायब झाले होते. दरम्यान, ते सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ पोस्ट करत अनेक आरोप आणि गौप्यस्फोट करत होते. दरम्यान, त्यांच्याविरोधात एक गुन्हा दाखल झाला आणि ते पोलिसांच्या रडारवर आले. (Santosh Deshmukh Murder Case: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणात वाल्मिक कराड मुख्य आरोपी)

वाल्मिक कराड याचा एन्काऊंटर करण्यासाठी ऑफर

दरम्यान, निलंबीत झाल्यांतर रणजित कासले यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अत्यंत खळबळजनक आरोप केले आहेत. वाल्मिक कराड याचा एन्काऊंटर करण्यासाठी मुंडे यांनीच आपल्याला ऑफर दिली होती, असा खळबळजनक दावा कासले यांनी केला. त्यामुळे ते सर्वाधिक चर्चेत आले. इतकेच नव्हे तर पुणे येथे विमानतळावर दाखल झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना कासले यांनी पुन्हा दावा केला की, विधानसभा निवडणुकीमध्ये EVM पासून दूर जाण्यासाठी वाल्मिक याने आपणास 10 लाख रुपये दिले होते. (हेही वाचा, Pune Man Tears Passport Pages: पुण्यातील व्यक्तीने फाडली पासपोर्टची पाने; कुटुंबापासून बँकॉक प्रवास लपवण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल)

वाल्मिक कराड याच्या नावाची संत बाळूमामा कंस्ट्रक्शन ही कंपनी आहे. ज्यामध्ये महादेव कराड आणि काळे पार्टनर आहेत. त्याच कंपनीच्या खात्यावरुन मतदानाच्या दिवशी माझ्या खात्यावर 10 लाख रुपये आले. मला गप्प राहण्यासा आणि इव्हीएमजवळ न फिरकण्यास सांगण्यात आले. मात्र, या तील साडेसात लाख रुपये आपण परत केले आहेत. उर्वरीत पैशांतून आणि पगारातील काही बचतीमधून माझा खर्च सुरु असल्याचे कासले म्हणाले. पुढे त्यांनी असेही सांगितले की, विधानसभा निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे हे अतिशय चुकीच्या पद्धतीने निवडून आले आहेत. त्या काळात मी परळी येथेच कर्तव्यावर होतो, असेही कासले म्हणाले. ते गुरुवारी सायंकाळी पुणे विमानतळ येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.