Sanjay Shirsath And Sushma Andhare (Image Credit - Facebook)

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Shushma Andhare) शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsath) यांच्याविरोधात आज पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात दावा दाखल करणार आहे. विशेष म्हणजे सुषमा अंधारे संजय शिरसाट यांच्यावर केवळ तीन रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील मेळाव्यात सुषमा अंधारे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याप्रकरणी सुषमा अंधारे यांनी शिरसाट यांच्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान सुषमा अंधारे यांच्यावर भाषणामध्ये अपशब्द वापरल्याच्या प्रकरणील छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून तपास सुरु आहे. उस्मानपुरा पोलीस ठाण्याच्या महिला अधिकाऱ्यांची तपासासाठी नेमणूक करण्यात आली. महिला आयोगाच्या निर्देशानंतर तपासणी सुरु आहे. आमदार संजय शिरसाट यांच्या भाषणाचा व्हिडिओ युट्यूबवर असल्यामुळे सध्या पोलीस त्यावरुनच तपास हा करत असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान आमदार संजय शिरसाट यांनी आपल्यावर लावण्यात आलेले सर्व  आरोप चुकिचे असल्याचे म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी मागील आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. सुषमा अंधारेंबद्दल एकही शब्द 'अश्लील' बोलल्याचा दाखवा, मी तात्काळ राजीनामा देतो, असं शिरसाट यांनी म्हटलं. माझ्यासाठी सत्ता महत्वाची नाही. मी चुकीचे काहीही बोललो असल्याचं सिद्ध केल्यास मी लगेच माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी तयार असल्याचे शिरसाट म्हणाले.