Rohit Pawar Tweet (Photo Credits: File Image)

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी (Bihar Assembly Election)  सुशांंत सिंंह राजपुत (Sushant Singh Rajput) च्या मुद्द्यावरुन प्रचार करण्याचा प्रयत्न भाजपकडुन केला जात असल्याची टीका अनेक राजकीय नेत्यांंकडुन केली जात होती. अशातच भाजपकडुन सुशांंतच्या प्रतिमा वापरलेले स्टिकर्स आणि पोस्टर सुद्धा छापल्याचे सुद्धा फोटो काही दिवस व्हायरल होत आहेत, याच मुद्द्यावरुन आता महाराष्ट्रातील नेत्यांंनी सुद्धा प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांंनी आज एक ट्विट करुन भाजपला धारेवर धरलं आहे. "सुशांंत सिंंह राजपुत प्रकरण्यात न्याय मागण्यासाठी देश एकवटला आहे मात्र केवळ निवडणुकांसाठी त्याचं वाईट राजकारण केलं जात आहे. बिहारच्या निवडणुकीसाठी हे भांडवल केलेलं आहे, मात्र यावेळेस विकासापासून वंचित असलेल्या बिहारमधील मूळ प्रश्नांपासून लक्ष हटवण्याच्या या अजेंड्याला लोक बळी पडणार नाहीत अशीच अपेक्षा", असे रोहित यांंचे ट्विट आहे.

दुसरीकडे रोहित पवार यांंच्या या टीकेवर काही भाजप समर्थकांंनी पलटवार करत सुशांत साठी देश एकवटला असेल पण तुमचेच सरकार हे प्रकरण आत्महत्या म्हणुन जाहीर करण्याचे प्रयत्न करत होते असे सुनावले आहे.

रोहित पवार ट्विट

दरम्यान, सुशांत सिंह राजपुत प्रकरणात सध्या सीबीआय कडुन तपास होत आहे, या प्रकरणातील कथित आरोपी सुशांंतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिची ड्रग्ज प्रकरणात NCB कडुन चौकशी होत आहे. या मध्ये आतापर्यंत रिया चा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि व अनुज केसवानी याला अटक करण्यात आली आहे.