Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

Sushant Singh Rajput Case:  बॉलिवूड मधील दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी विविध खुलासे झाले. तसेच यामधून ड्रग्जचे सुद्धा प्रकरण समोर आल्याचे दिसून आले. याच दरम्यान, सोशल मीडियातील मायक्रो ब्लॉगिंग बेवसाईट ट्विटरवर (Twitter) महाराष्ट्र राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांची लाखो फेक ट्विटर अकाउंट्सच्या माध्यमातून बदनामी केली गेल्याचा एक रिपोर्ट समोर आला आहे. याबद्दलची अधिक माहिची सायबर एक्सपर्ट यांच्याकडून देण्यात आली आहे.(Complaint against KBC: अमिताभ बच्चन, Sony TV यांच्या विरोधात भाजप आमदाराची पोलिसांत तक्रार, कौन बनेगा करोडपती कार्यक्रमातील प्रश्नावरुन वाद)

रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, मुंबई पोलीस, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह महाराष्ट्र सरकारची बदमानी करण्यासाठी एक कॅम्पेन राबवले गेले होते. त्यासाठी सायबर एक्सपर्ट यांच्यासह फॉरेन्सिक एक्सपर्ट यांच्याकडून चौकशी सुरु केली गेली होती. त्यामध्ये असे समोर आले की, बदनामी करण्याची मोहीम ही चीन,नेपाळ आणि हाँगकाँग मधून BOTs च्या माध्यमातून केली गेली होती. सायबर सेलच्या एक्सपर्ट्सनी असे ही म्हटले की, जवळजवळ 1.5 लाखांहून अधिक ट्विटर अकाउंट्स म्हणजेच 80 टक्के फेक अकाउंट्स समोर आली आहेत. त्यानुसार या अकाउंट्सच्या माध्यमातून निगेटिव्ह ट्विट्स किंवा रिट्विट्स केले गेल्याचे समोर आले आहे. हा सर्व प्रकार राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांच्या विरोधात करण्यात आल्याचे ही समोर आले आहे.(Sushant Singh Rajput Case: सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्याचे प्रसारमाध्यमांतील वृत्त चुकीचे; CBI ने दिले 'हे' स्पष्टीकरण)

दरम्यान, यामधील काही अकाउंट्स जी भारतातून चालवली गेली त्यांनी आपली ओळख लपवण्याकरिता प्रॉक्सी सर्वरचा वापर केला होता. तर आता यामधील बहुतांश ट्विटर अकाउंट डिलिट करण्यात येत आहेत. तसेट ट्विटवरील एखादी माहिती किंवा रिट्विट्स सुद्धा डिलिट केले जात आहेत. राज्य सरकार, मुंबई पोलिसांच्या विरोधात चालवल्या गेलेल्या मोहिमेसाठी जवळजवळ एक हजारांपेक्षा अधिक BOTs चा वापर केला गेल्याची ही स्पष्ट करण्यात आले आहे.