सुप्रिया सुळे यांनी घेतली स्वप्नील लोणकर याच्या कुटुंबियांची भेट; विद्यार्थ्यांना केले 'हे' आवाहन
Supriya Sule meets Swapnil Lonakar's Family (Photo Credits: Twitter)

एमपीएससी परीक्षा (MPSC Exam) उत्तीर्ण होऊनही नोकरी नसल्याने आत्महत्या (Suicide) करणाऱ्या स्वप्निल लोणकर (Swapnil Lonkar) याच्या कुटुंबियांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी लोणकर कुटुंबियांचं सांत्वन ककरुन त्याच्या बहिणीच्या शिक्षण आणि नोकरीची हमी दिली आहे. तसंच त्यांनी एपीएससीच्या सर्व विद्यार्थ्यांनाही खास आवाहन केले आहे. (Pune: नोकरी न मिळत असल्याने 24 वर्षीय MPSC विद्यार्थ्याची आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये लिहिली 'ही' बाब)

सुप्रिया सुळे यांनी दौंड तालुक्यातील केडगाव येथे जावून लोणकर कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी स्वप्निलच्या आई भावूक झाल्या. माझ्या मुलाने अनेकांना प्लाझ्मा दान केले. अनेकांचे जीव वाचवले. मात्र तो वाचू शकला नाही. आठ दिवसाांपूर्वी निर्णय झाला असता तर माझा मुलगा वाचला असता, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

सुप्रिया सुळे यांनी स्वप्निलच्या कुटुंबियांची जबाबदारी घेत त्याच्या बहिणीच्या शिक्षणाची आणि नोकरीची हमी दिली आहे. तिला एक मोबाईलही भेट देण्यात आला आहे. तसंच प्नीलच्या कुटुंबावर असलेल्या कर्जाची माहिती घेऊन पूर्ण निपटारा करण्याचे आदेश दिले आहेत.

सुप्रिया सुळे ट्विट:

यावेळी सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत एमपीएससीच्या सर्व विद्यार्थ्यांना खास आवाहन केले आहे. या विद्यार्थ्यांनी कोणताही वेगळा विचार करु नये. चर्चेतून मार्ग निघू शकतो. सरकार त्यांच्या पाठिशी आहे. खासदार म्हणून मी देखील तुमच्याशी चर्चा करण्यास तयार आहे, असे त्या म्हणाल्या.