पुणे विमानतळावर (Pune Airport) बुधवारी मोठा अपघात टळला. भारतीय हवाई दलाच्या (Indian Air Force) अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुखोई-30 MKI लढाऊ विमान (Sukhoi-30 MKI fighter jet) येथे उतरत असताना त्याचा टायर फुटला. हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी धावपट्टी साफ केली. आवश्यक तपासण्यांनंतर धावपट्टी उड्डाणासाठी खुली करण्यात आली. वास्तविक, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाची सेवा लोहगाव (Lohgaon) येथील भारतीय हवाई दलाच्या स्थानकावरून चालविली जाते. हवाई दलाच्या वैमानिकांनाही येथे प्रशिक्षण दिले जाते. हा हवाई दलाच्या सुखोई विमानांचा (Sukhoi aircraft) तळ आहे.
A Sukhoi-30 MKI fighter aircraft had a tyre burst while landing at the Pune airport leading to a blockage of the runway. The IAF personnel cleared the runway. After required checks, the runway was opened for flying operations: IAF officials
— ANI (@ANI) March 30, 2022
संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या निवेदनानुसार, पुणे विमानतळावर सुखोई 30 एमकेआय विमानाचा टायर फुटला. त्यामुळे धावपट्टीवर अडथळा निर्माण झाला. 30 मार्च रोजी दुपारी विक्रमी वेळेत विमानाला बाहेर काढण्यात हवाई दलाच्या जवानांना यश आले. त्यामुळे नागरी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. याप्रकरणी अधिक माहिती मिळणे बाकी आहे.