Sujay Vikhe Patil (Photo Credit - Twitter)

राज्यातील राज्यसभेचा निकाल (Rajya Sabha Election Result 2022) जाहीर झाला असुन महाविकास आघाडीचे (MVA) 3 उमेदवार तर भाजपचे (BJP) 3 उमेदवार निवडून आले आहे. ही निवडणूक चागंलीच चुरशीची झाली. महाविकास आघाडीकडून राज्यसभेच्या निवडणूकीसाठी जोरदार रणनीती आखण्यात आली होती पण देवेंद्र फडणवीसाच्या (Devendra Fadnavis) राजकीय खेळीसमोर महाविकास आघाडीला हार मानावी लागली. भाजपकडून धंनजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांचा विजय झाला आहे तर शिवसेनेकडून संजय पवार (Sanjay Pawar) यांना पराभवाचा सामना करावा लागला. या निकालानंतर अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहे. यावर आता भाजप खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe - Patil) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादीकडून शिवसेनेला संपवण्याचा डाव

सुजय विखे म्हणाले आहे की, शिवसेनेला संपवण्याच काम राष्ट्रवादी काॅंग्रेस कडून सुरु आहे. जर हाच उमेदवार राष्ट्रवादीचा असता तर निवडून आला असता, शिवसेनेचा उमेदवार होता म्हणुन राष्ट्रवादीने हात काढुन घेतला असे म्हणत सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडीची खिल्ली उडवली आहे. तसेच ते पुढे म्हणाले आहे की जोपर्यत राष्ट्रवादी थांबणार नाही तोपर्यत शिवसेना पक्ष पुर्णपणे वाचणार नाही. (हे देखील वाचा: Rajya Sabha Election Result 2022: राज्यसभा निकालावर छगन भुजबळ यांच परखड मत, म्हणाले - 'संजय राऊत थोडक्यात वाचले, नाहीतर उलटे झाले असते')

शिवसेनेने निकालाचा विचार करणं गरजेच

"पराभव होतो तेव्हा अनेक कारणं शोधली जातात. मात्र एवढ्या लांब जाण्यापेक्षा शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादीशी चर्चा करावी. ते सांगतील असं का केलं? राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची निकाल धक्कादायक नसल्याची प्रतिक्रिया म्हणजे त्यांना हे अपेक्षित होतं. याचा विचार शिवसेनेने करणं गरजेचं आहे", असं सुजय विखे पाटील म्हणाले.