पतीची हत्याकरुन प्रियकरासोबत पळून आलेल्या विवाहित महिलेचा मुलीला विष देऊन आत्महत्येचा प्रयत्न
(Representational Image/ Photo credits: Wikimedia Commons)

केरळ (kerala) येथे पतीची हत्याकरुन प्रियकरासोबत पळून आलेल्या विवाहितेने मुलीला विष देऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, मुलीचा मृत्यू झाला असून प्रेमयुगुल मृत्यूशी झुंज देत आहेत. ही घटना पनवेल (Panvel) येथे शनिवारी दुपारी घडली आहे. पोलिसांनी मुलीची मृतदेह ताब्यात घेतले असून दोघांना जवळील रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात धक्कादायक वातावरण निर्माण झाले आहे. तसेच पोलिस याप्रकरणी अधिक चौकसी करत आहे.

रिजोश आणि लिजी कुरीयन हे दाम्पत्य आपल्या दोन वर्षाच्या चिमुकलीसोबत केरळ येथे राहत होते. लिजी ही नोकरी करत होती. तसेच लिजी ज्या ठिकाणी नोकरी करत होती. त्याठिकाणी वासीम अब्दुलही काम करत असे. काही दिवसानंतर अब्दुल आणि लिजी यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले. यासंबधातून लिजी आणि अब्दुल याने रोजोशची हत्या करुन 5 नोव्हेंबर रोजी 2 वर्षाच्या मुलीसह पनवेल मार्केट यार्ड येथील समीर लॉजमध्ये लपून बसले. मात्र, रिजोशची हत्या केल्याप्रकरणी वसीमच्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती लिजीला मिळाली. यामुळे दोघांनी मुलीसह विष प्राशन करुन अत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात मुलीचा मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. हे देखील वाचा- मुंबई: वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेची कमाठीपूरा येथे आर्थिक वादातून हत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपार झाली तरी अब्दुल दरवाजा उघडत नसल्याने लॉजचालकाने शनिवारी दरवाजा तोडला. तसेच लॉज चालकाने आत गेल्यानंतर त्यांनी पाहिले तर, तिघेही बेशुद्धावस्थेत जमीनीवर पडले होते. त्यांना पनवेल येथील नाना धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यावेळी मुलीचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.