New Security Rules To Enter Mantralaya: मंत्रालयातील सुरक्षा आता आणखी कडक करण्यात येणार आहे. राज्य सरकार मंत्रालय, राज्य सचिवालयाच्या सुरक्षेसाठी नवीन सुरक्षा व्यवस्था (New Security Rules) लागू करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केली आहे. आम्ही मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी सुरक्षा व्यवस्था तयार करत आहोत. या अंतर्गत मंत्रालयात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पास दिला जाईल. ती व्यक्ती निघून गेल्यावर त्यांना पास परत करावा लागेल, असं मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.
कॅबिनेट फाइल्सच्या इलेक्ट्रॉनिक हालचालीसाठी ई-कॅबिनेट प्रणाली -
सरकार कामासाठी एक युनिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम तयार करणार असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. प्रत्येक कामासाठी एक युनिक आयडी तयार केला जाणार आहे. कॅबिनेट फाइल्सच्या इलेक्ट्रॉनिक हालचालीसाठी ई-कॅबिनेट प्रणाली सुरू केली जाणार असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. (हेही वाचा -Devendra Fadnavis Mantralaya Office Vandalized: महिलेकडून यंत्रणेच्या हातावर तुरी; देवेंद्र फडणवीस कार्यालयात तोडफोड प्रकरण)
वर्ग 2 मध्ये वर्गीकृत झालेल्या जमिनी वर्ग 1 मध्ये करण्यात येणार -
तथापी, गेल्या 30 ते 40 वर्षापूर्वी थकीत महसुली थकबाकीमुळे वर्ग 2 मध्ये वर्गीकृत झालेल्या जमिनी वर्ग 1 मध्ये बदलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानंतर या जमिनी शेतकऱ्यांना परत केल्या जातील, असे फडणवीस यांनी गुरुवारी सांगितलं. गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभाग आणि पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील उपस्थिती लावली. (हेही वाचा, Woman Vandalized Devendra Fadnavis' Office At Mantralaya: देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची अज्ञात महिलेकडून तोडफोड (Watch Video))