Woman Vandalises Devendra Fadnavis' Office At Mantralaya (फोटो सौजन्य -X/@lokmattimeseng)

Woman Vandalized Devendra Fadnavis' Office At Mantralaya: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मुंबईतील मंत्रालयातील कार्यालयाची (Office At Mantralaya)  शुक्रवारी अज्ञात महिलेने तोडफोड (Vandalized) केली. ही महिला पासशिवाय मंत्रालयात घुसली होती. तिने उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेरील नामफलक तोडून घोषणाबाजी केली. प्राप्त माहितीनुसार, महिलेने सुरक्षा प्रोटोकॉल न पाळता सचिवालयाच्या गेटमधून मंत्रालयात प्रवेश मिळवला. फडणवीस यांच्या कार्यालयात आल्यानंतर महिलेने तेथील मालमत्तेची तोडफोड केली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

व्हिडिओमध्ये, नेव्ही ब्लू शर्ट आणि काळी जीन्स घातलेली एक महिला मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या दारावरची नेमप्लेट फोडताना दिसत आहे. व्हिडिओ पुढे दिसत आहे की, ही महिला तिचा व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीवर ओरडताना दिसत आहे. कर्मचारी आणि पोलीस हवालदारांनी महिलेला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, परंतु ती दक्षिण टोकाच्या गेटमधून पळून जाण्यात यशस्वी झाली. (हेही वाचा -Maharashtra Vidhan Sabha Election 2024: एरंडोल पारोळा मध्ये मतदारांनी साथ दिल्यास बंद पडलेल्या प्रकल्पांना उभारी देत बेरोजगार तरुणांचा टक्का कमी करणार; अनिल महाजन यांनी जाहीर केली ध्येयं!)

देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची अज्ञात महिलेकडून तोडफोड, पहा व्हिडिओ - 

दरम्यान, पोलीस आयुक्तांनी महिलेच्या या कृत्याची गंभीर दखल घेतली आहे. मंत्रालयातील अधिकारी तोडफोड करणाऱ्या महिलेचा शोध घेत आहेत. उच्च-सुरक्षा असलेल्या सरकारी इमारतीमध्ये सुरक्षेचे उल्लंघन कसे होऊ शकते? याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहे.