Petrol/ Diesel Car(Photo Credits: PTI)

State Assembly Budget Session 2021: राज्याचे अर्थसंकल्प अधिवेशन येत्या 1 ते 10 मार्च दरम्यान पार पडणार आहे. तर एकूणच कोरोनाची परिस्थिती पाहता यंदाच्या वर्षात अधिवेशन फक्त दहा दिवसात आटोपले जाणार आहे. याच पार्श्वभुमीवर राज्यात वाढलेल्या इंधन दरवाढीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. तर दर दिवसागणिक वाढत चालले असून आता शंभरी सुद्धा त्यांनी गाठली. अशातच राज्य सरकारकडून वाढलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सवलत देण्याचा विचार करत आहे. त्यामुळे नागरिकांना थोड्याप्रमाणात दिलासा मिळू शकतो. याबद्दलची माहिती अर्थखात्यामधील सुत्रांकडून दिली गेली आहे.

तर 2018 मध्ये तेव्हाच्या राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर दुष्काळ म्हणून 2 रुपयांचा सेस आकारला होता. पण आता दुष्काळ नसला तरीही तो सेस आकारला जात आहे. यामुळेच इंधनावरील सेस मध्ये थोडी कपात केली जाऊ शकते याचा विचार राज्य सरकारकडून केला जात आहे.(State Assembly Budget Session 2021: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 1 ते 10 मार्च या कालावधीत पार पडणार; दहा दिवसांच्या कालावधीवरून विरोधी पक्षाचा ठाकरे सरकारवर निशाणा)

दरम्यान, या महिन्यात राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सरकारने अनेक जिल्ह्यात निर्बंध लावले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव सरकारने यंदा अर्थसंकल्पीय अधिवेशन फक्त 10 दिवसांच्या कालावधीसाठी ठेवले आहे. तसेच यंदा कोरोनामुळे पावसाळी आणि हिवाळी अधिवेशन कमी कालावधीत उरकले गेले. त्याचसोबत अधिवेशनावेळी कोरोना संबंधित सर्व नियमांचे पालन केले जाणार आहे. अर्थसंकल्पापूर्वी सर्व आमदारांची कोरोनाची चाचणी केली जाणार आहे.(Maharashtra Assembly Budget Session 2021: विधिमंडळ अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपद निवडणूक होणार का? पाहा कोणकोणते चेहरे आहेत मैदानात)

तर यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड होण्याची शक्यता कमी आहे. ठाकरे सरकारमधील अनेक आमदारांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे हे आमदार यंदा अधिवेधनात उपस्थित राहणार नाहीत. तसेच त्यांना मतदान करता येणार नाही.