Maharashtra Assembly Budget Session 2021: विधिमंडळ अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपद निवडणूक होणार का? पाहा कोणकोणते चेहरे आहेत मैदानात
Maharashtra Legislative Assembly | (Photo Credit : Youtube)

Assembly Speaker Election 2021: राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Assembly Budget Session 2021) येत्या 1 मार्च पासून सुरु होत आहे. अधिवेशन सुरु होत आहे. मात्र अद्याप विधानसभा अध्यक्षांची निवड झाली नाही. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारले. तेव्हापासून ही जागा रिक्तच आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनीही एकदा राज्य सरकारला एक स्मरणपत्र धाडत विधानसभा अध्यक्ष कधी नेमणार असे विचारले होते. दरम्यान, राज्यात कोरोना व्हायरस पुन्हा एकदा डोके वर काढत असल्याचे चित्र आहे. राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांना कोरोना व्हायरस संसर्गही झाला आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष पदासाठी विधिमंडळ अधिवेशनात निवडणूक (Assembly Speaker Election) होणार का याबाबत उत्सुकता आहे.

राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांना कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याने हे मंत्री अधिवेशनाला उपस्थित राहण्याची शक्यता अगदीच कमी आहे. त्यातच हे अधिवेशन डिजिटल रुपात घेता येईल काय याबाबतही राज्य सरकारकडून चाचपणी सुरु आहे. त्यामुळे जर मतदानासाठी आमदार, अथवा मंत्रीच प्रत्यक्षात येऊ शकत नसतील तर मग निवडणूक कशी घ्यायची हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. (हेही वाचा, Pooja Chavan Suicide Case: संजय राठोड अधिवेशनात मंत्रीच असणार की विकेट पडणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे लक्ष)

विधासभा अध्यक्ष पदासाठी चर्चित नावे

  • संग्राम थोपटे
  • सुरेश वरपूडकर
  • अमीन पटेल

दरम्यान, राज्य विधिमंडळाचे अध्यक्षपद हे महाविकासआघाडी सरकारमध्ये काँग्रेस पक्षाकडे आले आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी काँग्रेस पक्ष कोणाचे नाव पुढे करते आणि पुढे केलेल्या चेहऱ्याला इतर घटक पक्षांची सहमती मिळते का याबाबत उत्सुकता आहे. राजकीय वर्तुळातील चर्चा पाहता विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये संग्राम थोपटे, सुरेश वरपूडकर आणि अमीन पटेल यांच्या नावाची चर्चा आहे.