ST Bus Driver Suicide: नगर मध्ये एसटी चालकांन संपवल आयुष्य, एसटीला गळफास घेऊन केली आत्महत्या
MSRTC Bus | (File Image)

अहमदनगरमधील (Ahmednagar) शेवगाव येथील परिवहन महामंडळाच्या चालकाने  उभ्या असलेल्या एसटीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी समोर आली आहे. या घटनेनंतर सगळीकडे मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे. शेवगाव आगारातील दिलीप हरिभाऊ काकडे असे आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते चालक म्हणून येथील आगारात कार्यरत होते. डेपोत उभ्या असलेल्या एसटीच्या मागील बाजूस गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच आगराच्या अन्य कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी डेपोत धाव घेतली. पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही घटना परिसरात मोठी खळबळजणक असून कर्मचाऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. (हे ही वाचा MSRTC DA Hike: एसटी बस कर्मचार्‍यांना शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणेच महागाई भत्ता 28%, घरभाड्यातही वाढ; मंत्री अनिल परब यांची माहिती.)

दिवाळी  सण तोंडावर असताना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कर्मचारी गुरुवारी राज्यात आक्रमक पाहताना दिसले. वेतन आणि इतर मागण्यांसाठी या कर्मचाऱ्यांनी कालपासून पगारासह विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली होती. राज्यातील विविध ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले होत. प्रामुख्याने पुणे (Pune), कोल्हापूर (Kolhapur), नागपूर (Nagpur), सोलापूर (Solapur), नाशिक (Nashik) या ठिकाणी एसटी कर्मचारी (ST Staff) आक्रमक झाले होते. पंरतु काल झालेल्या आंदोलनचे परिणाम दिसुन आले

कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या सरकारकडून मान्य

आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या अखेरीस सरकारनं मानल्या आहेत.  त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं आहे. एस टी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 12 वरून 28 टक्क्यांवर वाढवण्यात आलाय तसंच घरभाडे भत्त्यातही वाढ केलेली आहे. आज मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचारी संघटनांची मंत्रालयात बैठक झाली त्यात काही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.

अहमदनगरमधील (Ahmednagar) शेवगाव येथील परिवहन महामंडळाच्या चालकाने  उभ्या असलेल्या एसटीला गळफास घेत आत्महत्या केल्यानं विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासह भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केलीय.

गोपीचंद पडळकर यांनी केले राज्य सरकारवर टिकास्त्र