Special ST for Female Government Employees: शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी 21 सप्टेंबरपासून विशेष एसटी सेवा; येथे पहा वेळापत्रक
ST Bus (Image used for representational purpose only) (Photo credits: PTI)

कोरोना संकट काळात रेल्वे व इतर सार्वजनिक वाहतूक बंद आहे. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी रेल्वेची सोय उपलब्ध असली तरी त्याच्या वेळा आणि फेऱ्या यामुळे प्रवास करताना गैससोय होवू शकते. हीच बाब लक्षात घेऊन एसटी महामंडळाने शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या कार्यालयीन वेळेनुसार महिला विशेष फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष फेऱ्या सोमवार. 21 सप्टेंबरपासून सुरु होणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली.

डोंबिवली, पनवेल, विरार येथून मंत्रालयाकरीता प्रत्येकी एक बस प्रायोगिक तत्त्वावर चालविण्यात येणार आहे. त्यानंतर महिला प्रवाशांचा प्रतिसाद पाहून या फेऱ्या वाढवण्यात येतील. दरम्यान, डोंबिवली, पनवेल, विरार येथून सकाळी एक एसटी बस सुटेल. तर मंत्रालयातून सायंकाळी याच मार्गावर एसटी बस सोडण्यात येईल.

Anil Parab Tweet:

एसटी बससेवेचे वेळापत्रक:

# पनवेल ते मंत्रालय स. 8.15 वा.

# डोंबिवली ते मंत्रालय स.8.15 वा.

# विरार ते मंत्रालय स. 7.45 वा.

# मंत्रालय ते डोंबिवली- सायं. 5.35 वा.

# मंत्रालय ते विरार- सायं. 5.35 वा.

# मंत्रालय ते पनवेल- सायं. 5.45 वा.

दरम्यान, कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर 50% क्षमतेने धावणारी लालपरी आता पूर्ण क्षमतेने धावू लागली आहे. तसंच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सर्व बसेस वारंवार सॅनिटाईझ करण्यात येणार असून प्रवाशांनी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे बंधकारक असणार आहे. (मुंबईतील नागरिकांच्या सेवेसाठी 350 ऐवजी 500 गाड्या येत्या 21 सप्टेंबर पासून धावणार, पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय)

विशेष म्हणजे गर्दी टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या 150 अधिक फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे आतापर्यंत दिवसाला 350 लोकल फेऱ्यांची संख्या 500 पर्यंत वाढवण्यात आली आहे. 21 सप्टेंबरपासून या नव्या लोकल फेऱ्यांना सुरुवात होईल. यातील 30 फेऱ्या सकाळी आणि 29 फेऱ्या सायंकाळी चालवण्यात येतील.