
मध्य रेल्वे कडून कसारा रेल्वे स्टेशन (Kasara Railway Station) वर फ्लायओव्हर बीम उभारण्यासाठी दोन दिवसांचा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. हा ब्लॉक शनिवार 8 मार्च आणि रविवार 9 मार्च दरम्यान तीन टप्प्यामध्ये घेतला जाणार आहे. शनिवार सकाळपासून ब्लॉकच्या कामाला सुरूवात होणार आहे. या ब्लॉकचा परिणाम मध्य रेल्वेच्या वाहतूकीवर होणार आहे. कसारा इथे येणार्या लोकल अंशतः रद्द केल्या जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. नक्की वाचा: Ashwini Vaishnaw On Mumbai Local: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! आता फक्त 2 मिनिटांत मिळणार लोकल ट्रेन.
मध्य रेल्वेवरील 8, 9 मार्चच्या कसारा स्थानकातील ब्लॉक
पहिला ब्लॉक:
कसारा रेल्वे स्टेशन वर शनिवारी 11.40 ते 12.10 या वेळेमध्ये अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक बंद असेल.
दुसरा ब्लॉक:
कसारा रेल्वे स्टेशन वर दुसरा ब्लॉक रविवार 9 मार्च दिवशी असणार आहे. हा ब्लॉक 11.40 ते 12.10 या वेळेत असणार आहे.
तिसरा ब्लॉक:
कसारा रेल्वे स्टेशन वर तिसरा ब्लॉक रविवार 9 मार्च दिवशी दुपारी 4 ते 4.25 या वेळेत असणार आहे.
तिन्ही ब्लॉकच्या दरम्यान सकाळी 9.34 वाजता सीएसएमटी स्टेशन मधून सुटणारी कसारा लोकल आसनगाव रेल्वे स्टेशन पर्यंतच चालवली जाणार आहे. यादरम्यान आसनगाव-कसारा लोकल सेवा रद्द केली जाणार आहे.
रविवार 9 मार्च दिवशी दुपारी 1.10 वाजता सीएसएमटी स्टेशन मधून सुटणारी कसारा लोकल कल्याण पर्यंत चालवली जाईल. कल्याण-कसारा लोकल रद्द केली जाणार आहे. शनिवार, रविवार सकाळी 11.10 कसारा- सीएसएमटी लोकल आसनगाव स्थानकातून सोडली जाईल. तर शनिवार-रविवार 4.16 ची कसारा-सीएसएमटी लोकल कल्याण स्थानकातून सोडली जाईल.