Rajesh Kale | (Photo Credit- Facebook)

सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे (Rajesh Kale) यांची भारतीय जनता पक्षातून (BJP) हकालपट्टी करण्यात आली आहे. महापालिका उपायुक्तांना शिवीगाळ आणि खंडणी मागितल्याचा आरोप राजेश काळे यांच्यावर होता. या प्रकरणात पक्षाची प्रतिमा मलीन झाल्याचा ठपका घेवत भाजप नेतृत्वाने ही कारवाई (Solapur Deputy Mayor Rajesh Kale Expelled From BJP) केली आहे. सोलापूर भाजपा शहर सरचिटणीस शशी थोरात यांनी आज (13 जानेवारी) ही घोषणा केली.

उपायुक्तांना शिवीगाळ आणि खंडणी मागितल्याबद्दल राजेश काळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. पक्षातील पदाधिकाऱ्यांनी काळे यांच्याबाबत स्थानिक नेतृत्वाकडे तक्रारही केली होती. याबाबतचा सविस्तर अहवाल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पाठविण्यात आला होता. तसेच, काळे यांना उपमहापौर पदावरुन पायउतार करावे अशीही पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची मागणी होती. त्यामुळे भाजप कार्यकारिणीने हा निर्णय घेतला. (हेही वाचा, Bjp Deputy Mayor Rajesh Kale Arrested: सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना अटक; उपयुक्तांना शिवीगाळ आणि खंडणी मगितल्याप्रकरणी गुन्हा दाखल)

काय आहे प्रकरण?

उपमहापौर राजेश काळे यांच्यावर पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना खंडणी ( Deputy Mayor Ransom Case Solapur) मागितल्याचा आरोप आहे. तसेच, महापालिका आयुक्त पी.शिवशंकर,उपायुक्त धनराज पांडे,विभागीय अधिकारी नीलकंठ मठपती आदींना काळे यांनी अर्वाच्च भाषेत शिविगाळ केल्याचा आरोपही आहे. काळे यांनी संबंधितांना कथीत शिविगाळ करतानाचे एक फोन रेकॉर्डींग सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना खंडणी मागितल्याप्रकरणी राजेश काळे यांच्या विरोधात पोलिसांमध्येगुन्हा दाखल झाला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन राजेश काळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात त्यांना अटकही करण्यात आली होती.

दरम्यान, सोलापूर भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम देशमुख यांनी राजेश काळे यांना नोटीस बजावली होती. या नोटीशीत म्हटले होते की, पक्षाने या आधीही आपल्याला बेकायदेशीर कृत्यांबद्दल नोटीस बजावल्या होत्या. अनेकदा समज देऊनही आपण आपल्या कृती आणि कृत्यांमध्ये बदल केला नाही. आफल्यात कोणताही फरक पडत नाही. अनेकदा सांगूनही आपण ऐकले नाही. महापालिका अधिकाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिविगाळ करुन आपण भारतीय जनता पक्षाची प्रतिमा मलिन केली आहे. त्यामुळे येत्या 24 तासाच्या आत आपण खुलासा करवा. आपल्याला पक्षातून बडतर्फ का करु नये? असा सावाल काळे यांना पाठवलेल्या नेटीशीत पक्षाने विचारला होता. अखेर काळे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.