Bjp Deputy Mayor Rajesh Kale Arrested: सोलापूरचे भाजप उपमहापौर राजेश काळे (Rajesh Kale) यांना अटक करण्यात आली आहे. उपयुक्तांना शिवीगाळ आणि खंडणी मगितल्याप्रकरणी राजेश काळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल झाल्यापासून राजेश काळे फरार झाले होते. त्यानंतर आज गुन्हे शाखेने टेंभुर्णी परिसरातून काळे यांना अटक केली. (वाचा - Girish Mahajan Booked for Extortion: भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर खंडणीचा आरोप; कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल)
राजेश काळे यांच्यावर पालिका आयुक्त पी शिवशंकर यांना शिवीगाळ आणि उपायुक्त धनराज पांडे यांना पाच लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय काळे यांनी आणखी एका अधिकाऱ्याला बेकायदा काम करण्यासाठी धमकी दिल्याचं म्हटलं जात आहे. यापूर्वीदेखील राजेश काळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. (हेही वाचा - BMC Elections 2022: ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’; बीएमसी निवडणुकीसाठी शिवसेनेकडून गुजराती मतदारांना साद)
दरम्यान, 29 डिसेंबर रोजी पालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी राजेश काळे यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर राजेश काळे फरार झाले होते. त्यानंतर पोलिसांनी राजेश काळे यांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. राजेश काळे आपल्या संवैधानिकपदाचा गैरवापर करून बेकायदा कामे करण्यासाठी पालिका प्रशासनावर दबावतंत्राचा वापर करीत आहेत. तसेच ॲट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करून बदली करण्याची धमकी देत असल्याचे उपायुक्त पांडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.