Solapur Road Accident (Photo Credits: ANI)

बार्शी-सोलापूर (Barshi- Solapur) रस्त्यावर क्रुझर जीप आणि एसटीची धडक बसून आज सकाळी भीषण अपघात (Accident) झाल्याचे समजत आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य 10 जण जखमी झाले आहेत. स्थानिकांच्या माहितीनुसार, हा अपघात खड्डा चुकवण्याचा प्रयत्नात असताना झाला आहे. एसटी मधील प्रवासी हे बार्शी पंचायत समितीच्या एमएसआरएलएम विभागातील महिला व पुरुष कर्मचारी असून ते कामानिमित्त सोलापूर ला जात होते, राळेरास-शेळगाव दरम्यान सकाळी साधारण 10 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात, एसटीचा पुढील भाग जीप मधेय घुसल्याने जीप चा चुराडा झाला आहे. यातील जखमींची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर भीषण अपघात; 60 गाड्या अंगावरुन गेल्याने छिन्न विछिन्न अवस्थेत आढळला मृतदेह

स्थनिकांच्या माहितीनुसार, बार्शी-सोलापूर रस्त्याचं काम गेल्या दीड वर्षांपासून रखडलं आहे. या रस्याचं काम दीड वर्षापूर्वीच मंजूर झालं होतं. मात्र तांत्रिक कारणामुळे हे काम अद्यापही सुरू झालेलं नाही. ठिकठिकाणी खड्डे झाले असून हेच खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात आज एसटी आणि जीपचा अपघात झाला आहेत.

ANI ट्विट

दरम्यान, या अपघाताच्या नंतर तरी प्रशासना रस्त्याच्या दुरुस्ती कामाला वेग आणेल. या बाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. अपघातातील मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.