Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: IANS)

ठाणे (Thane) जिल्ह्यातील तलासारी तालुक्यात एका 3 वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर आजूबाजुच्या परिसरात एकच खळबळ माजली. याप्रकरणी पीडित मुलीच्या आई-वडिलांनी जवळील पोलिस ठाण्यात एका अज्ञात व्यक्तिविरोधात तक्रार दिली होती. दरम्यान, या घटनेचा तपास करण्यासाठी आलेल्या महाराष्ट्र पोलिसांच्या (Maharashtra Police) मदतीला आलेल्या स्निफर डॉगने (Sniffer Dog) काही क्षणातच आरोपीला शोधून काढले आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या या स्निफर डॉगवर कौतूकाचा वर्षाव केला जात आहे. या संदर्भात टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा एक मजदूर असून त्याला दारूचे व्यसन आहे. अलीकडेच त्याची पत्नी त्याला सोडून निघून गेली आहे. दरम्यान, आपल्या आई वडिलांसोबत एका झोपडीत झोपलेल्या 3 वर्षाच्या चिमुकलीला उचलून घेऊन गेला. त्यावेळी आरोपी आपल्या मुलीला घेऊन जात असल्याचे पाहताच पीडिताच्या आईने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पीडिताच्या वडिलांसह शेजाऱ्यांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, त्याठिकाणी अंधार असल्यामुळे आरोपी तिथून फरार झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पीडित मुलगी एका शेतात सापडली. दरम्यान, तिच्या आई-वडिलांनी तिला तातडीने एका रुग्णालयात घेऊन गेले. तिथे तिच्यावर बलात्कार झाल्याची माहिती मिळाली. हे देखील वाचा- Thane: ठाणे जिल्ह्यात येत्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडणूक लढविणाऱ्या महिला उमेदवाराच्या गाडीला अज्ञात व्यक्तींनी लावली आग

त्यानंतर पीडिताच्या आईवडिलांनी जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन एका अज्ञात व्यक्तिविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार, स्थानिक पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी ताबोडतोब घटनास्थळ गाठले. दरम्यान, चौकशीसाठी पोलिसांच्या मदतीसाठी आलेल्या स्नेफर डॉगला घटनास्थळी आरोपीची एक चप्पल सापडली. त्याच चप्पलच्या आधारावर स्नेफर डॉगने आरोपीच्या घराकडे धाव घेतली. ज्यामुळे आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी आरोपीच्या विरोधात अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे, आरोपीने याआधीही खेड्यातील व कारखान्यातील महिलांवर लैंगिक अत्याचार केले आहेत. जिथे तो रोजंदारीवर मजुरी करायचा.