प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

Thane: ठाणे जिल्ह्यात येत्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडणूक (Gram Panchayat Elections) लढविणाऱ्या महिला उमेदवाराची गाडी सोमवारी अज्ञात लोकांनी पेटवली. तसेच उमेदवार आणि तिच्या पतीवर काही जणांनी गोळीबार केला. या घटनेमध्ये कोणालाही इजा झाली नाही. हल्ला करण्यात आलेली महिला उमेदवार 15 जानेवारी रोजी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडणुक लढवणार आहे. यासंदर्भात पोलिसांनी माहिती दिली आहे.

या सर्व प्रकारातून सुखरुप सुटका करून हे जोडपे घटनास्थळावरून पळून गेले. सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास काही जणांनी भिवंडी टाउनशिपच्या करबांव भागात राहणाऱ्या उमेदवार कविता भोईर यांच्या कारच्या टायरला आग लावली. (हेही वाचा - Gangster Chhota Rajan: गँगस्टर छोटा राजन याच्यासह तिंघांना दोन वर्षांची शिक्षा, पनवेल येथील बिल्डरला खंडणी मागितल्याचे प्रकरण)

या घटनेत कार अर्धवट जळाल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली. पत्रकारांशी बोलताना भोईर यांनी आरोप केला आहे की, गेल्या 15 दिवसांपासून त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सांगितलं जात आहे. उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यास ठार मारण्याच्या धमक्याही दिल्या जात आहेत.

दरम्यान, कविता भोईर यांनी सांगितलं की, त्या आपल्या विरोधकांना घाबरत नाहीत. ही निवडणुकीत मी लढवणार असून यात घवघवीत यशही मिळवून दाखवेल. भिवंडी तालुक्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम बालसिंग यांनी या प्रकरणी गुन्ह्याची नोंद केली आहे. परंतु, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.