Shree Siddhivinayak Ganpati (PC - Facebook)

Shree Siddhivinayak Ganpati Darshan live Streaming: आज सर्वत्र सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. महाराष्ट्रचं नव्हे तर संपूर्ण भारतात गणेशोत्सावाचा सोहळा मोठ्या उत्सहात साजरा केला जातो. संपूर्ण भारतात आणि विदेशातही लोक आपापल्या परंपरेनुसार दीड दिवस ते अगदी 11 दिवसापर्यंत गणपतीची स्थापना करून गणेशोत्सव साजरा करतात. यंदा कोरोना संकटाचा परिणाम गणेशोत्सवर दिसून येत आहे.

कोरोना संकटामुळे यंदा भाविकांना गणेश मंदिरात जाणं शक्य होणार नाही. त्यामुळे अनेक गणेश मंडळांनी भाविकांना ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मुंबईच्या सिद्धीविनायक गणपती मंदिर ट्रस्टने बाप्पाचा आरती सोहळा लाईव्ह पाहण्याची सोय केली आहे. पहाटे 5 वाजल्यापासून आरतीला सुरूवात होणार आहे. त्यामुळे भाविकांना आपल्या मोबाईलद्वारे खालील लिंकवर सिद्धीविनायक गणपती मंदिरातील आरतीचा लाईव्ह सोहळा पाहता येणार आहे. (हेही वाचा - Ganesh Chaturthi 2020 Pran Pratishthapana Muhurat: गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्याचा गणेश चतुर्थी 2020 चा मुहूर्त, पुजा विधी घ्या जाणून)

सिद्धीविनायक गणपती आरती सोहळा लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा -

हिंदू कॅलेंडरनुसार, भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. गणपती बाप्पाचा जन्मदिवस म्हणून गणेश चतुर्थी साजरी केली जाते. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षादरम्यान गणपती म्हणजेचं गणपती देवाचा जन्म झाला होता. इंग्रजी कॅलेंडरनुसार, हा दिवस ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात येतो.