प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: IANS)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालल्याने रुग्णांसह बळींचा सुद्धा आकडा वाढत आहे. राज्य सरकार सुद्धा कोरोनाच्या रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. याच दरम्यान आता एक धक्कादायक प्रकार लातूर येथून समोर आला आहे. लातूर मधील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकिय विज्ञान संस्थेच्या रुग्णालायत कोविड19 च्या रुग्णांना महागडी औषधे बाजारातून खरेदी करण्याची शिफारस करण्यात येत होती. याच कारणास्तव आता शासकीय मेडिकल महाविद्यालयांच्या अधिष्ठतांना कारणे दाखवा नोटीस धाडण्यात आली आहे.

कोरोनाबाधित रुग्णांना बाजारातून Tossilizumab हे महागडे औषध आणण्यास सांगतल्याच्या प्रकरणी वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दखल घेतली. यामुळे  वैद्यकिय शिक्षण संचालकांनी शासकीय मेडिकल महाविद्यालयाच्या अधिष्ठतांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच या नोटीसला येत्या 3 दिवसात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.(Coronavirus: कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटिव्ह आल्यास रिपोर्ट पहिल्यांदा रुग्णाला नाही MCGM ला द्या- मुंबई महापालिका आयुक्तांचे चाचणी केंद्रांना आदेश)

दरम्यान,राज्यातील शासकीय महाविद्यालयाच्या रुग्णालांत कोविड19 च्या रुग्णांवर मोफत उपचार करण्यात यावेत असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तरीही अशा पद्धतीचा प्रकार लातूर मधील मेडिकल कॉलेजमधून समोर आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.लातूर मध्ये शुक्रवारी आणखी 3 कोरोनाबाधितांची भर पडल्याने आकडा 220 वर पोहचला आहे. तर काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने कोरोनासंबंधित करण्यात येणाऱ्या चाचणीसाठी 2200 रुपये आकारण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते.