Pune Crime News: पुणे शहराला झालंय तरी काय? असा सवाल उत्पन्न व्हावा अशा घटना घडत आहेत. कधी कोयता गँगने घातलेला धुडगूस, कधी आलीशान कारने चिरडले जाणारे लोक, तर कधी नजरचुकीने घडणाऱ्या घटना. या सर्व घटनांचे सीसीटीव्ही फुटेज पाहून कोणत्याही संवेदनशील माणसाचे हृदय द्रावले नाही तरच नवल. विद्येचे माहेरघर मानले जाणाऱ्या पुणे शहरात पाठिमागच्या काहीच तासांमध्ये तीन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. ज्याचे CCTV फुटेज पाहून काळजाचा थरकाप होतो. पहिली घटना आहे, इमारतीमधील कार कोसळल्याची (Pune Car Accident), दुसरी सिंहगड रोड परिसरात रस्त्यावर झालेल्या हाणामारीची (Pune Brawl CCTV Footage), तर तिसरीही घटना पुण्यातीलच असून, ती हॉटेल कर्मचाऱ्यांनी तीन तरुणांना केलेली बेदम मारहाण दाखवणारी. तिन्ही घटना मन सुन्न करुन टाकणाऱ्या आहेत. वाचकांना सूचना अशी की, सदर व्हिडिओतील दृश्ये (Viral Video Pune) आपले लक्ष विचलीत करु शकातात. त्यामुळे व्हिडिओ स्वत:च्या जबाबदारीवरच पाहा.
वरच्या मजल्यावरुन कार थेट जमीनवर
घटना क्रमांक एक: पुणे येथील विमाननगर परिसरातील आलीशान शुभ आपार्टमेंट. सकाळी साधारण 10.00 वाजणेचा सुमार. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या पार्किंग जागेतून चालक आपली कार मागे घेत असताना त्याचा अंदाज चुकला. इतका की, कार पार्किंगच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या मोकळ्या जागेवरुन थेट खाली जमीनीवर कोसळली. या धक्कादायक घटनेचा सीसीटीव्ही फुटेज पुढे आले आहे. घटनेत कोणालाही इजा पोहोचली नाही. मात्र, घटना इतकी गंभीर आहे की, पाहणाऱ्यास धक्का बसतो आहे. (हेही वाचा, Truck Driver Damages Hotel In Indapur: इंदापूर मध्ये जेवण नाकारलेल्या हॉटेल वर मद्यधुंद चालकाने घातला ट्रक; आरोपी अटकेत (Watch Video))
विमाननगर परिसरातील शुभ अपार्टमेंटमधील दृश्य
पुणे
पुण्यातील विमाननगर पतीसरातील थरारक घटनेचा cctv समोर
दुसऱ्या मजल्यावरील पार्किंगमधील कार पुढं घेण्याऐवजी चुकून मागे घेतली असता ती खाली पडली
सुदैवाने यामध्ये कोणालाही गंभीर इजा झाली नाही
ही घटना विमाननगर परिसरातील शुभ अपार्टमेंट येथे रविवारी सकाळी 10 वाजता घातली आहे… pic.twitter.com/wEmCNK8Lxb
— Rahul Kulkarni (@RahulAsks) January 22, 2025
अर्धमेले होईपर्यंत मारहाण
घटना क्रमांक दोन: ही घटना आहे बिबेवाडी परिसरातील. पुणे शहरातील गुन्हेगारी दाखवणाऱ्या या व्हिडिओत पाहायला मिळते की, दोन तरुणांना बेदम मारहाण केली जात आहे. या दोघांना मारहाण करणारे टोळके हे कथीतरित्या एका बारमधील कर्मचारी असल्याची प्राथमिकमाही आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये या पीडितांना इतकी गंभीर मारहाण झालेली दिसते की, दोघेही जवळपास अर्धमेले झाले आहेत. (हेही वाचा, Pune Shocker: मुलासोबतच्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या पत्नीच्या बोटाचा पतीने घेतला चावा, नराधमाला अटक)
प्रचंड मारहामीमुळे तरुण बेशुद्ध
पुण्यातील बिबवेवाडी भागात बार मधील कर्मचाऱ्यांकडून २ तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.#punecrime #Punenews #Pune pic.twitter.com/Z1YmgaRyyo
— Maharashtra Times (@mataonline) January 21, 2025
दुचाकीवरील तिघांकडून कारचालकाला शिवीगाळ, धमकी
घटना क्रमांक तीन: या घटनेमध्ये सुद्धा तीन तरुन एका कारचालकाला धमकावताना दिसत आहेत. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आले. रस्त्याने जाताना गाडीमुळे खड्ड्यातील पाणी कथीतपणे उडल्याचा आरोप करत दुचाकीवरुन आलेले तीन तरुण एका कारचालकाला धकमाव आहेत. कारचालक विनम्रपणे चुकून पाणी उडल्याचे सांगतो आहे. तरी देखील हे तरुण तुला गाडी निट चालवता येत नाही का? असे म्हणत थेट गाडी फोडण्याची धमकी देत आहे.
थेट गाडी फोडण्याची धमकी
Road-Rage Kalesh (A Guy in Car attacked by 3 Youths on Scooter) Pune
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) January 13, 2025
दरम्यान, पुणे शहर आणि जिल्ह्यातील या घटनांमुळे समाजमन अस्वस्थ होत आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलीस आणि प्रशासनाने तातडीने पावले उचलत अशा प्रकारे गुंडगिरी करणाऱ्या तरुणांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.