इंदापूर (Indapur) मध्ये ट्रक हॉटेल मध्ये घुसवल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. यामध्ये ट्रक ड्रायव्हर मद्यधुंद अवस्थेमध्ये होता. हॉटेल मालकाने खायला देण्यास नकार दिल्याच्या रागात त्याने थेट ट्रक हॉटेलवर घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना पुणे-सोलापूर महामार्गावरील गोकुळ हॉटेल (Hotel Gokul) मधील आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडीयामध्ये वायरल झाला आहे.
पोलिसांच्या अहवालानुसार, ड्रायव्हर हा सोलापूर कडून पुण्याच्या दिशेने ट्रक चालवत येत होता.गोकूळ हॉटेल मध्ये आला आणि त्याने जेवण मागितले पण त्याला मालकाने नकार दिला. हॉटेल बंद असल्याचं त्याने सांगितलं. पण ऐकण्याच्या मनस्थिती मध्ये नसलेल्या त्याने थेट हॉटेलवर ट्रक चालवला. यामुळे हॉटेलचं नुकसान झालं आहे. हॉटेलच्या आसपास असलेल्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचेही नुकसान केले आहे.
गोकुळ हॉटेल मधील घटना
VIDEO | Maharashtra: A truck driver rammed his vehicle into a hotel building in #Pune after he was reportedly denied food. The truck driver was allegedly drunk. The incident took place on Friday night.#PuneNews #maharashtranews
(Source: Third Party)
(Full video available on… pic.twitter.com/TrPEF1ZxrA
— Press Trust of India (@PTI_News) September 7, 2024
स्थानिकांनी यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण ट्रक चालकाने कुणाचेच काही ऐकलं नाही. घटनास्थळी पोलिस आले. त्यांनी चालकाला अटक केली. सध्या त्याच्यावर Motor Vehicles Act आणि BNS च्या कलम 109, 281, 324 (4)(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.