Dhananjay Munde | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याविरोधात एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. संबंधित महिलेने मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना पत्र लिहून तक्रार दिली आहे. या प्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. ओशिवारा पोलीस ठाण्यात आपली तक्रार नोंदवून घेत नाहीत, असा आरोपही या महिलेने पत्रातून केला होता. तसेच तिचा जीवाला धोका असल्याचेही तिने सांगितले आहे. या तक्रारीनंतर धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ माजली आहे.

एका महिलेने ट्विटरवर तक्रारीची एक प्रत ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. दरम्यान, पीडिताने मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार, लैंगिक शोषण आणि छळ तसेच जीवन व मालमत्तेचे रक्षण केल्याचा आरोप केला आहे. धनंजय मुंडे यांनी लग्नाचे अमिष दाखवत बलात्कार, फसवणूक आणि लैंगिक अत्याचार केले आहेत असेही पीडित महिलेने तक्रारीत म्हंटले आहे. हे देखील वाचा- MNS Strategy For Various Elections 2021 in Maharashtra : राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेची महत्त्वाची बैठक, राज्यातील निवडणुकांच्या रणनीतीवर चर्चा

याआधी अक्टूबर 2019 मध्ये धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्राची माजी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याविरोधात एका कार्यक्रमात अपशब्दांचा वापर केला होता. ज्यामुळे त्यांच्याविरोधात भादंवि कलम 500, 509, 294 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

धनंजय हे भाजपचे दिग्गज नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांची चुलत बहीण पंकजा मुंडे यांना पराभूत केले होते.  शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून धनंजय मुंडे यांना 2014 मध्ये विधान परिषदेत विरोधी पक्षनेते बनवण्यात आले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होते. तथापि, यापूर्वी ते भाजपमध्येही होते आणि नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांना बीजेव्हायएम महाराष्ट्राचे अध्यक्ष केले.