Mumbra: धक्कादायक! मुंब्रा येथे शाररिक संबंधास नकार देणाऱ्या पत्नीची हत्या, पतीला अटक
crime I mage only representative purpose (Photo credit: pxhere)

शारीरिक संबंधास नकार दिला म्हणून एका व्यक्तीने पत्नीची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना ठाण्याच्या (Thane) मुंब्रा (Mumbra) परिसरात शनिवारी (8 मे) घडली आहे. पत्नीची हत्या करून पळून जाण्याचा प्रयत्न करत असलेल्या पतीला अटक केली असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. चारित्र्याच्या संशयावरून आणि शारीरिक संबंधास नकार दिल्यामुळे आरोपीने पत्नीची हत्या केली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.

लोकमतने दिलेल्या माहितीनुसार, शान खान उर्फ बाबू असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. बाबूचे अनेक विवाह झाले असून तो शनिवारी डायघर गावातील माऊली परिसरात राहणाऱ्या पत्नीकडे गेला होता. यावेळी शारीरिक संबंधावरून त्यांच्या वाद झाला. त्यानंतर बाबूने रागाच्या भरात तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान, तिच्या डोक्यात चिणीमातीचे पोळपाट घातले. एवढ्यावर न थांबता बाबूने तिचे डोके उंबरठ्यावर आपटले. ज्यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर शांतपणे त्याने घराला बाहेरून कढी लावून तो फरार झाला. हे देखील वाचा-पुणे: पिंपरी चिंचवड येथे नर्ससह केमिस्ट यांच्याकडून रेमिडेसिव्हर इंजेक्शचा काळाबाजार, आरोपींना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या तावडीत सापडू नये म्हणून त्याने त्याचा मोबाईल नंबर बंद केला. तसेच दुसऱ्या नंबरवरून तो काही लोकांच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी त्याच्या मोबाईल लोकशनची पडताळणी करून एक पथक दादर रेल्वे स्थानकावर नेले. त्यावेळी पोलिसांना पाहून त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला अटक केली आहे.