शंभर रुपयाच्या वाटणीवरून एका तरुणाने आपल्या काकाची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. ही घटना पुणे (Pune) जिल्ह्यातील संत कबीरनगर येथील कोतवाली परिसरात घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. मयत व्यक्तीच्या पत्नीने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी फरार असून त्याचा शोध घेतला जात असल्याची माहिती मिळत आहे. पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली असल्याचे दिसत आहे. यामुळे पुण्यात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.
सय्यद अली (वय, 65) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सय्यद याला चार मुले आणि एक विवाहित मुलगी आहे. त्यांचा मोठा मुलगा हनीफ कोलाकात्यात काम करतात. सलीम आणि रफिफ हे दोघेही पुण्यात टाईल्स बसवण्याचे काम करतात. तर, पत्नी हसीना खातून आणि त्यांच्या धाकटा मुलगा अली हसन उर्फ मुसे सोबत राहतात. मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी सय्यद यांचा धाकटा मुलगा अली हसन आणि पुतण्या लियाकत हे अमी नदीत मासे पकडण्यासाठी गेले होते. त्यानंतर मुलाने घरी आणलेली मासे सय्यद यांनी 200 रुपयांना विकले. त्यानंतर मंगळवारी संध्या लियाकत त्याच रक्कमेचा वाटा म्हणून शंभर रुपये मागत होता. त्यावेळी हसन आणि लियाकत यांच्यात वाद सुरु झाला. त्यानंतर लियाकत सय्यद यांच्याकडे गेला. त्यावेळी लियाकतने रागाच्या भरात सय्यद यांच्या डोक्यात काठीने प्रहार केला. ज्यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना तातडीने जिल्ह्या रुग्णालयात करण्यात आले. मात्र, रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. हे देखील वाचा- Mumbai: मुंबई विमानतळावर 2.935 किलोच्या Cocaine ची तस्करी, गिनी नागरिकाला अटक करत सुनावली न्यायालयीन कोठडी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी लियाकत अली विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तो फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. तसेच शवविच्छेदनानंतर सय्यद यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे, अशी माहिती लोकमतने आपल्या वृत्तात दिली आहे.