Thane Murder Case: धक्कादायक! कासारवडवली येथील आनंदनगरमध्ये युवकाची निर्घृण हत्या, आरोपी फरार
Crime (PC- File Image)

Thane Murder Case: ठाण्यातील (Thane) कासारवडवलीतील आनंदनगरमध्ये एका युवकाची निर्घृण हत्या (Murder) करण्यात आली आहे. या घटनेनंतर ठाणे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. युवकाची तलवारीने हत्या करण्यात आली आहे. आरोपी घटनास्थळावरून फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हत्या का केली याचं कारण अद्याप समोर आले नाही. शुक्रवारी रात्री ही घटना घडली आहे. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत पंचनामा केला.

मिळालेल्या माहितीनुसारा, ठाण्याच्या कासारवडवली आनंदनगरमध्ये रात्रीच्या ९.३० ते १०च्या सुमारास एका युवकाची निर्घृण हत्या केली. सतीश पाटील असं हत्तेत मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. या हत्येमागील नेमकं कारण अद्याप समजले नाही. त्याचसोबत हत्या कोणी केली हे देखील समोर आले नाही. त्यामुळे ठाणे पोलिसांसमोर मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.

सतीश पाटील काही कामानिमित्त आनंदनगर परिसरात आला होता त्यावेळी त्याच्यावर हल्ला झाला. पाटील त्याच्या कारमध्ये जात असताना दुचाकीवर आलेल्या दोन तरुणांनी त्याच्या कारसमोर दुचाकी आडवी घालत थांबवली. त्यानंतर दुचाकी वरुन उतरून कारचा दरवाजा उघडून त्यांच्यावर तलवारीने सपासप हल्ला केला. युवकाचा या हल्लेत जागीच मृत्यू झाला, हल्ला झाल्यानंतर दोघेंही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. घटनेची माहिती मिळताच, परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला. पोलिस आरोपीच्या शोधात आहे.