Shivshahi Bus | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: YouTube)

Shivshahi Bus Accident: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ (Maharashtra State Road Transport Corporation) संचलीत शिवशाही बस (Shivshahi Bus) हा मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. शिवशाही बसमध्ये मिळणाऱ्या सुविधेपेक्षा या बसला होणाऱ्या अपघातांमुळेच तिची अधिक चर्चा असते. आजही (8 मार्च 2019) शिवशाही बसला अपघात घडल्याचे वृत्त आहे. या अपघातात बस चालक आणि एक प्रवाशी अशा दोघांचा मृत्यू झाला. तर, इतर प्रवासी जखमी झाल्याचे समजते.

प्राप्त माहितीनुसार, नाशिक-मुंबई-आग्रा हायवेवर गाडी चालवत असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बसला अपघात घडला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उलटल्याने हा अपघात घडल्याचे समजते. या बसमधून काही विद्यार्थीही प्रवास करत होते. इतर प्रवाशांसबत हे विद्यार्थीही या अपघातात जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. (हेही वाचा, व्हिडिओ: शिवशाही बस जागेवरच पेटली, आलीशान गाडी जळून खाक)

प्राप्त माहितीनुसार, शिवशाही बस अहेरी येथून हैदराबादसाठी निघाली होती. दरम्यान, करीमनगर-मंचेरीयलजवळ आज पहाटे सुमारे तीन वाजताच्या सुमारास या बसला अपघात घडला. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर तर, काहींची चिंताजनक असल्याचे समजते.