महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री कोण? या प्रश्नावरून महायुती मध्ये सुरु असणाऱ्या वादामुळे राज्याचे राजकारण अंधाराच्या मार्गावर आहे. अशातच काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी 'तमसो मा ज्योतिर्गमय' हा श्लोक ट्विट केल्याने अनेक चर्चा रंगत होत्या. यातही आता विशेष म्हणजे शिवसेनेचे (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हे ट्विट आपल्या अकाउंट वरून रिट्विट केल्याने राजकीय वर्तुळात या चर्चांना आणखीनच उधाण आले आहे. वास्तविक प्रियांका गांधी यांनी हा श्लोक शेअर करताना सोबत दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांचा संदर्भ दिला होता. 31 ऑक्टोबर रोजी इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी असल्याने त्याआधी प्रियंका यांनी हा श्लोक ट्विट केला होता, तर संजय राऊत यांनी आज म्हणजेच 1 नोव्हेंबर रोजी हा श्लोक रिट्विट केला आहे. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेवरून सुरु असणाऱ्या वादात शिवसेना आणि काँग्रेस (Congress) या दोन बड्या पक्षांच्या विचारजुळणीचे हे संकेत असल्याचे सुद्धा म्हंटले जात आहे.
प्रियंका गांधी यांनी ट्विट करताना आला एक खास फोटो शेअर करत "आमची आजी (इंदिरा गांधी) मला आणि माझ्या भावाला (राहुल गांधी) नेहमी हा श्लोक शिकवायची, या श्लोकाची पहिली ओळ आमच्याकडून पाहिल्यावर आम्ही पुढे पूर्ण करत असू मात्र आज या श्लोकांची शेवटची ओळ प्रकर्षाने आठवत आहे" असे म्हंटले होते.
प्रियांका गांधी ट्विट
यह वह पहला श्लोक है जिसे हमारी दादी ने मेरे भाई और मुझे सिखाया। अक्सर हमें देख कर इसकी पहली पंक्ति बोलती थीं और हम इसे पूरा करते थे।
आज इसकी आख़िरी पंक्ति दिल में गूंज रही है।#IndiraGandhi pic.twitter.com/VboHOkYSxK
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) October 31, 2019
दरम्यान, संजय राऊत यांनी अनपेक्षितपणे ही पोस्ट आज रिट्विट केली आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यावर अद्याप मुख्यमंत्री कोण याबाबत स्पष्ट संकेत समोर येत नसल्याने द्विधा परिस्थिती आहे. या स्थितीत संजय राऊत हे शिवसेनेचा गाडा ढकलत पुढे नेण्याच्या प्रयत्नात अग्रेसर आहेत, तर भाजपाकडून अजूनही फडणवीस यांनाच मुख्यमंत्री बनवण्याचे संकेत दिले जात आहेत.
शिवसेनेला पाठींबा देण्याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचं महत्त्वाचं विधान
या एकूणच वादात महायुतीमध्ये फूट पडत असल्याचे दिसत असताना काही ठिकाणहून शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी ने एकत्र येऊन सत्ता स्थापन करावी असेही म्हंटले जात आहे. मात्र अजूनही कोणाकडूनच स्पष्ट भूमिका मांडण्यात आली नाही.