नेटफ्लिक्स (फोटो सौजन्य- Pixabay)

शिवसेनेच्या (Shivsena)  आयटी सेलचे सदस्य रमेश सोलंकी (Ramesh Solanki) यांनी अमेरिकन ऑनलाईन स्ट्रीमिंग कंपनी नेटाफिल्क्स (NETFLIX)  विरुद्ध तक्रार नोंदवण्यासाठी लोकमान्य टिळक मार्गावरील पोलीस स्थानकात धाव घेतली आहे.नेटफ्लिक्स वरील वेब सिरीजमुळे हिंदूंची आणि परिणामी देशाची बदनामी होत असल्याचा सोलंकी यांचा आरोप आहे. नेटफ्लिक्स वर अलीकडेच रिलीझ झालेली सेक्रेड गेम्स (Sacred Games), लैला (Laila), घोउल (Ghoul)  या वेबसिरीज असो वा हसन मिन्हाज (Hasan Minhaj) यासारख्या कलाकारांचे स्टॅन्ड अप कॉमेडीचा शोज असो, प्रत्येक माध्यमातून हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. यामुळे जागतिक स्तरावर भारताविषयी व हिंदूंविषयी असलेली प्रतिमा मालिन होत आहे असाही आरोप सोलंकी यांनीही लगावला आहे.

रमेश सोलंकी यांच्या आरोपानुसार, हा हिंदु विरोधी पवित्रा असून यामुळे जागतिक स्तरावर देशाला खाली दाखवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. नेटफ्लिक्स वरील दर दुसऱ्या सिरीज मधून हिंदूंविषयी चुकीची व खोटी प्रतिमा दाखवली जात आहेत, असे पोलिसांना सांगण्यात आले होते. (देशात संतापाची लाट; गणपती अपवित्र होईल म्हणून दलित महिला आमदाराला गणेश मंडपात प्रवेश नाकारला (Video)

ANI ट्विट

दरम्यान मध्यंतरी जाहिरातींमध्ये सुद्धा धार्मिक संदर्भ देत एखाद्या धर्माला चुकीच्या पद्धतीने दाखवण्याचे अनेक प्रसंग समोर आले होते. उद्धरण द्यायचे झाल्यास रेड लेबल या चहाच्या ब्रँडच्या जाहिरातीत गणपती विशेष असा एक विषय दाखवण्यात आला होता. ज्यात एक हिंदू इसम गणपतीच्या कारखान्यात जाऊन मूर्ती बाबत माहिती घेत असतो मात्र मूर्तिकार हा मुस्लिम असल्याचे कळताच तो टाळाटाळ सुरु करतो असे दाखवण्यात आले होते. यावरून सुद्धा नेहमी हिंदूंना अशीसनू दाखवले जात असल्याचे आरोप लगावत ट्विटर सह अन्य सोशल मीडिया माध्यमांवर #BoycottRedlabel यासारखे हॅशटॅगही ट्रेंड होते.