मुंबई: वीर सावरकर पंतप्रधान असते तर पाकिस्तानचा जन्मच झाला नसता: उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे (फोटो सौजन्य- ट्वीटर)

शिवसेना (Shivsena) अध्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांच्या हस्ते काल मुंबईत विक्रम संपथ (Vikram Sampath) लिखित Savarkar: Echoes From A Forgotten Past या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यानिमित्ताने उपस्थितांशी संवाद साधताना उद्धव यांनी सावरकरांवर (Veer Savarkar) टीका कारण्याऱ्यांवर पलटवार केला.याआधी " जर का सावरकर देशाचे पंतप्रधान असते तर पाकिस्तानचा (Pakistan) जन्म सुद्धा झाला नसता, आमचे सरकार हे हिंदुत्ववादी आहे आणि म्ह्णूनच मी अजूनही सावरकरांसाठी भारतरत्नाची मागणी करतो" असेही उद्धव म्हणाले. मागील काही काळात स्वातंत्र्य सैनिक वीर सावरकर यांच्यावर आरोप प्रत्यारोप करत मानहानी केल्याचे अनेक प्रसंग समोर आले होते. मग ते दिल्ली विद्यापीठात काँग्रेसशी सलंग्न युवावर्गाने सावरकरांच्या पुतळ्याला चप्पलांचा हार घालणे असो वा प्रसिद्ध वृत्तवाहिनेने केलेला सावरकर 'नायक की खलनायक' हा कार्यक्रम असो सतत सावरकरांच्या प्रतिभेवर प्रश्न उगारण्यात आले होते.

वास्तविक एनडीए सरकारने सत्तेत आल्यापासूनच वेळोवेळी हिंदुत्ववादी पवित्रा स्वीकारत आल्याचे म्हंटले जाते, काही अंशी उद्धव यांनी आपल्या भाषणातून या चर्चांची पुष्टी केली. माध्यमांच्या माहितीनुसार, उद्धव यांनी काँग्रेस वर जोरदार टीका करत अनेकांवर निशाणा साधला, "मणिशंकर अय्यर हे आज जरी समोर दिसले तरी त्यांना जोडे मारले पाहिजेत, तसेच राहुल गांधी यांना हे पुस्तक वाचायला द्यायला हवे, देशाचा पंतप्रधान व्हायच्या आधी देश समजून घेण्याची गरज आहे" अशा शब्दात सुनावले आहे.

ANI ट्विट

याशिवाय, सावरकरांनी वयाची 14 वर्षे तुरुंगवास भोगला होता त्या तीव्रतेचा कारावास जर का नेहरूंनी 14 मिनिटे सहन केला असता तरी मी त्यांना वीर जवाहरलाल नेहरू म्हणालो असतो मात्र सावरकर शिक्षा भोगून मातृभूमीत आले त्यानंतर त्यांची सर्वाधीक अहवेलना करण्यात आली, यामुळे जाणून बुजून सावरकरांना डावलले जात आहे का असा प्रश्न देखील उद्धव यांनी केला. (सावरकरांना मानत नाहीत त्यांना भर चौकात फटकावले पाहिजे : उद्धव ठाकरे)

दरम्यान याच कार्यक्रमात त्यांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावरही निशाणा साधत भाष्य केले. काल मराठवाडा मुक्तिदिन निमित्त संभाजीनगर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, मात्र या कार्यक्रमाला जलील अनुपस्थित होत. यावर तुझा धर्म कुठला म्हणून तू निवडून आला का...? असा सवाल करत उद्धव यांनी जलील यांना सुनावले