महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. कारण शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांतील चर्चा आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचल्या आहेत. त्यामुळे आज या तिन्ही पक्षांतील बडे नेते मिळून सत्ता स्थापनेची घोषणा करतात का हे बघणं महत्त्वाचं ठरेल. परंतु जरी आज नव्या सरकारची घोषणा झाली तरी, राज्यपालांकडे मात्र सत्ता स्थापनेचा दावा हा सोमवारी करण्यात येणार आहे कारण राज्यपाल हे स्वतः दोन दिवस दिल्लीत असणार आहेत.
एक नजर टाकूया आज घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींकडे...
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आनि आदित्य ठकारे यांनी काल शरद पवार यांच्या निवासस्थानी सिल्वर ओक येथे भेट घेतली. या भेटीदरम्यान शिवसेना आनि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांतील नेते तिथे उपस्थित होते.
आज उद्धव ठाकरे सर्व शिवसेना आमदारांची बैठक घेऊन स्वतः त्यांच्याशी बोलणार आहेत. या बैठकीदरम्यान कॉमन मिनिमन प्रोग्राम विषयी चर्चा होणार आहे. तसेच सर्व आमदारांना आपली कागदपत्रे घेऊन व पाच दिवसांचे कपडे घेऊन बोलावण्यात आले आहे.
संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकर परिषद घेतली. त्यादरम्यान त्यांनी, मुख्यमंत्रीपदच काय इंद्रपद दिले तरीही माघार नाही अशी आक्रमक भुमिका घेऊन भारतीय जनता पक्षावर जोरदार टिका केली आहे.
आज मुंबई महापौर आणि उपमहापौर पदाची घोषणा करण्यात येणार आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित राहणार आहेत.
शिवसेना नेते संजय राऊत लीलावती रुग्णालयात दाखल
त्याचसोबत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन पक्षांची देखील एक महत्त्वाची बैठक आज पार पडणार आहे. ही बैठक वाय. बी. सेंटर येथे पार पडेल.