Sanjay Mandlik And Chandrakant Patil (Photo Credit: Facebook)

कोल्हापूरमध्ये (Kolhapur) संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांच्यामुळेच भाजपचा (BJP) पराभव झाला, असे विधान चंद्रकात पाटील (Chandrakant Patil) यांनी केले होता. चंद्रकांत पाटील यांच्या या विधानावर नाराजी व्यक्त करत संजय मंडलिक यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाला कमी जागा मिळाव्यात म्हणून चंद्रकांत पाटील यांनीच त्यांना बंडखोरी करायला सांगितली आहे, असा आरोप संजय मंडलिक यांनी केला आहे. तसेच चंद्रकांत पाटील यांनी यांच्या आरोपात काहीही तथ्थ नाही असेही ते म्हणाले आहेत. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखातीत संजय मंडलिक बोलत होते.

चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथे रविवारी पत्रकार परिषेद घेतली होती. त्यावेळी ते बोलत होते की, "विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरमध्ये भाजपचा पराभव झाला आहे. याला एकमेव बंडखोर नेते संजय मंडलिक जबाबदार आहे. संजय मंडलिक यांच्या बंडखोरीमुळे कोल्हापूरमध्ये भाजपच्या वाटेला अपयश आले आहे". चंद्रकांत यांनी केलेले हे आरोप संजय मंडलिक यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच "चंद्रकांत पाटील यांनीच शिवसेना पक्षाच्या कमी जागा याव्यात यासाठी मला बंडखोरी करायला सांगितली होती. तसेच चंद्रकांत पाटील यांच्याकडे त्यांच्या पक्षाने मोठी जबाबदारी दिली. अशात त्यांना इथल्या पराभवाचे खापर जर चार महिन्यापूर्वी खासदार झालेल्या माझ्यावर फोडायचे असेल तर काय बोलायचे असेही मंडलिक म्हणाले आहेत". हे देखील वाचा- शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांना सत्ता स्थापनेनंतर मिळू शकते या तीन मंत्रालयांची जबाबदारी

प्रत्येक निवडणुकीचे संदर्भ लक्षात घेवून मतदारराजा संबधित उमेदवारांना मत देत असतो. लोकसभेच्या वेळी वातावरण वेगळे होते. तसेच विधानसभेत मतदाराने विचार करुन उमेदवारांना कौल दिला आहे. एवढेच नव्हेतर चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही असेही मंडलिक यांनी स्पष्ट केले आहे.