मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फणा काढून बोलण्याची गरज नाही: शिवसेना खासदार संजय राऊत
Sanjay Raut (Photo Credits: Twitter)

'शिवसेनेला 50-50 फॉर्म्युल्यानुसार अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री पद देणार असा शब्द भाजपने कधीच दिला नव्हता, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपल्या भाषणादरम्यान केले आहे. या विधानानंतर लगेचच शिवसेनेतील अनेकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

याचे प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांना तीव्र शब्दात एक टोला लगावला आहे. 'लोकसभेआधी जे ठरले होते, तेच द्यायचे आहे, आम्ही चुकीचे काही मागत नाही व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फणा काढून बोलण्याची गरज नाही, मी पक्षाची भूमिकाच मांडत आहे असे ते म्हणाले.

शिवसेनेचे 45 आमदार खरंच भाजपच्या संपर्कात... की हा आहे शिवसेनेवर दबाव आणण्याचा भाजपचा एक प्रयत्न? वाचा सविस्तर

देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात म्हटले की त्यांनी स्वत: अमित शहा यांना फोन करून 50-50 फॉर्म्युलाचे आश्वासन शिवसेनेला दिले होते का असे विचारले असता, शहा यांनी आपण असे आश्वासन शिवसेनला दिले नसल्याचे म्हटले.

शिवसेना-भाजप चर्चेची पहिली बैठक रद्द; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या वतीने खा. संजय राऊत यांची घोषणा

यावर राऊत म्हणाले की, "ज्यांच्याकडे 145 आमदारांचा पाठिंबा आहे, असं कोणीही सरकार स्थापन करून मुख्यमंत्री बनू शकतं. उद्या एकनाथ खडसेही तसे म्हणू शकतात किंवा वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकरही तसे म्हणू शकतात. इतकंच काय तर शरद पवारही तसे म्हणू शकतात."