भाजप कडे जर का बहुमत असेल तर कमळ ऑपरेशनची गरज काय; संजय राऊत यांचा सवाल
Sanjay Raut | Photo Credits: Twitter/ ANI

महाराष्ट्रात सत्तास्थापन करून मुख्यमंत्री (Maharashtra CM) पदाची शपथ घेतलेल्या भाजपा (BJP) सरकारकडे जर का बहुमत आहे तर सिद्ध करायला इतका वेळ आणि त्यासाठी हे फोडाफोडीचे राजकरण का करावे लागतेय? असा सवाल आज शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून केला. भाजप नेते सत्तेसाठी वेडे झाले आहेत, त्यांचा हा आनंद फार वेळ टिकणार नाही कारण जेव्हा विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल तेव्हा स्पष्ट चित्र समोर येईल आणि सत्ता हातातून गेल्याने त्यांची मानसिक स्थिती बिघडेल पण अशा वेळी आमच्याकडे जे स्पष्ट बहुमत आणि त्याच्याशी संबंधित कागदपत्रे आहेत त्यांचा वापर करून आम्ही सत्ता स्थापन करू असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाला ऑपरेशन कमळ Opreation Kamal)  वापरावे लागतेय याचंच अर्थ त्यांच्याकडे बहुमत नाही आणि जर बहुमत सिद्ध झालं नसेल तर राज्यपालांनी त्यांना शपथविधी कसा करु दिला असाही प्रश्न राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाजपच्या कमळ ऑपरेशनवर जोरदार टीका केली. देशातील आयकर विभाग, पोलीस, ईडी आणि सीबीआय ही कमळ ऑपरेशनची सूत्रे आहेत पण यातून काहीही निष्पन्न निघणार नाही. अजूनही त्यांच्याकडे बहुमत नसल्याने पैसे, सत्ता आणि अतिरिक्त बळ वापरून ते फोडाफोडी करू पाहत आहेत असाही आरोप संजय यांनी भाजपवर लगावला आहे.

ANI ट्विट

दरम्यान, काल मुंबईतील ललित हॉटेल मध्ये ठेवण्यात आलेल्या शिवसेना आमदारांवर पहारा देत असताना काही साध्या वेशातील पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांनी सुनावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यावर उत्तर देताना हे सिव्हिल ड्रेस मधील पोलीस होते की भाजपचे गुंड हे अजूनही कळले नाहीये असे उत्तर राऊत यांनी दिले. या सर्व प्रकरणात आता राज्याचे लक्ष लागून आहे ते सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे. 10. 30  वाजता कोर्टात दुणावनी सुरु होणार असून यात भाजपने राज्यपालनाकडे सोपवलेलंय कागदपत्रातून नेमकी माहिती समोर येण्याची आशा आहे.