पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते येत्या काही दिवसात मुंबईमध्ये भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. हा भूमिपूजन सोहळ्याला मुख्यमंत्र्यांसमवेत एक लाखाहून जास्त लोक उपस्थित राहणार आहेत. मात्र शिवसेनेला(Shivsena) या सोहळ्यासाठी आमंत्रण देण्यात आले नसल्याची माहिती समोर येत आहे.
गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये महाराष्ट्रातील विकास प्रकल्पांवर चर्चा झाली. तर येत्या काही दिवसात मोदींच्या हस्ते महाराष्ट्रातील भूमिपूजनाचे कार्य पार पडणार आहे. मुंबई- नागपूर समृद्धी महामार्ग आणि मेट्रोच्या कामांचाही या भूमिपूजन सोहळ्यात प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे. तर नागपूरच्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम भूमिपूजनानंतर सुरु होणार आहे.
या भूमिपूजनाच्या सोहळ्याचे आयोजन येत्या 18 डिसेंबर रोजी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मात्र युतीतील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उपस्थित राहणार का? अशा चर्चा राजकीय पक्षात चालू झाल्या आहेत.