Image For Representation (Photo Credits: Instagram)

यंदा कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर सर्व धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परिणामी यंदा रायगडावर (Raigad) होणारा शिवराज्याभिषेक सोहळा सुद्धा गर्दी न करता अत्यंत साधेपणाने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असं असलं तरी शिवराज्याभिषेक (Shivrajyabhishek Sohala 2020)  हा शिवभक्तांसाठी लाईव्ह दाखवण्यात येईल अशी घोषणा काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी राजे भोसले (Chhatrapati Sambhaji Raje Bhosale)  यांच्या मार्फत करण्यात आली होती. आजही संभाजी राजे यांनी एक ट्विट करून शिवभक्तांना शिवराज्यभिषेक दिन घरीच राहून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. Shivrajyabhishek Sohala: शिवराज्याभिषेक सोहळा यंदा तिथीनुसार 4 जून ला होणार साजरा; जाणून घ्या 'या' सुवर्ण मुहूर्ताचा इतिहास

दरवर्षी शिवराज्यभिषेक तिथी आणि तारखेनुसार दोन वेगळ्या दिवशी पार पडतो. यंदा सुद्धा तिथीनुसार 4  जून रोजी तर तारखेनुसार दरवर्षीप्रमाणे 6  जून रोजी शिवराज्यभिषेक साजरा केला जाणार आहे. शिवभक्तांनी मात्र हा सोहळा घरात राहून शिवरायांना मनातून मुजरा करत साजरा कारवाया असे आवाहन छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी केले आहे.

छत्रपती संभाजी राजे भोसले ट्विट

दरम्यान,  मागील वर्षी या कार्यक्रमासाठी देशविदेशातून अनेक मान्यवर सुद्धा उपस्थित राहिले होते. यंदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजाभिषेक सोहळ्याचे 347 वे वर्ष आहे. मात्र कोरोनाचे संकट लक्षात घेता अगदी मोजक्या उपस्थितीत रायगडावर शिवराज्यभिषेकाची परंपरा राखली जाणार आहे. या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्याची सोय करण्याचा विचार असलयाचे काही दिवसांपूर्वी संभाजी राजे यांनी बोलून दाखवले होते.