शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत हाकालपट्टी केल्याचं सांगण्यात आले आहे. शिवाजीराव अढळराव पाटील हे पुण्याच्या शिरूर (Shirur) मतदार संघातून खासदार म्हणून लोकसभेत निवडून गेले होते.
काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून महाविकास आघाडीच्या राज्यातील सरकारला धक्का दिला. शिवसेनेतील आणि सहयोगी अन्य आमदारांना घेऊन त्यांनी सुरूवातीला सुरत मग गुवाहाटी आणि गोवा गाठलं. शिंदेंच्या या बंडातून राज्यात आता शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाले आहेत. यावरूनच सोशल मीडीयात शिवाजीरावांनी एकनाथ शिंदेंचं अभिनंदन करणारी पोस्ट केली केली होती. 'गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा, अभिनंदन मुख्यमंत्री साहेब' असं ट्वीट देखील केलं आहे. यावरूनच त्यांची हाकालपट्टी करण्यात आली आहे. Maharashtra Assembly Session: महाराष्ट्र विधिमंडळाचं दोन दिवसीय विशेष अधिवेशन आज पासून; विधानसभा अध्यक्ष निवडणूक, बहुमत चाचणी पार पडणार.
महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदावर मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब @mieknathshinde यांची नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! pic.twitter.com/HN4ZMzXqO8
— Shivajirao Adhalrao (@MPShivajirao) July 1, 2022
मागील लोकसभा निवडणूकीमध्ये शिरूर मतदारसंघात शिवाजीरावांना एनसीपीच्या अमोल कोल्हे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर विधानसभा निवडणूकीनंतर शिवसेनेने आता एनसीपी, कॉंग्रेस सोबत हातमिळवणी केली. मध्यंतरीच्या काळात अनेकदा कोल्हे आणि शिवाजीराव यांच्यामध्ये लहान मोठे खटके, शाब्दिक आरोप-प्रत्यारोप पहायला मिळाला आहे. त्यांनी शिवसेना-एनसीपी या राजकीय जवळीकीवर आपली नाराजी बोलून दाखवली होती.