Lok Sabha Election 2024: शिवसेना (UBT) कडून मोठा दावा, काँग्रेसचा नकार; जागावाटपासाठी महाविकासआघाडीचा 16-16 चा फॉर्म्यूला?
Maha Vikas Aghadi | (Photo Credits: ANI)

लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. दुसऱ्या बाजूला विरोधकांची देशपातळीवरील इंडिया आघाडीतही जागावाटपाची बोलणी सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीचा (India Alliance) एक भाग असलेली महाराष्ट्रातील महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सुद्धा जागावाटपावर बोलणी करत आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (UBT) आघाडीने 23 जागांची मागणी केली आहे. जी काँग्रेस पक्षाने फेटाळल्याचे समजते. शिवसेना पक्षाने 23 जागा जिंकल्या असल्या तरी शिवसेनेची सध्यास्थिती पाहता त्यातील बहुतांश खासदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. त्यामुळे ठाकरे यांच्या शिवसेनेचा दावा वस्तुस्थितीस्त धरुन नसल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणने आहे. दरम्यान, जागावाटपाबद्दल मविआकडून  अद्याप तरी कोणीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही.

एकजूट महत्त्वाची- अशोक चव्हाण

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे की, इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये एकजूट असणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक पक्षालाच वाढीव आणि जास्त जागा हव्या असतात. पण, काही झाले तरी सर्व पक्षांनी वस्तुस्थिती पाहून निर्णय घेणे आवश्यक आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून होणारी 23 जागांची मागणी ही सध्यास्थितीत तरी जास्तच आहे. दरम्यान, अशोक चव्हाण यांच्या विधानावर शिवसेना (UBT) गटाकडून काय प्रतिक्रिया येते याबातब उत्सुकता आहे. (हेही वाचा, Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणूक जागा वाटप सूत्र ठरविण्यासाठी मविआकडून समिती स्थापन;दिग्गज नेत्यांचा समावेश, घ्या जाणून)

वरिष्ठांची बैठक

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अत्यंत माफक शब्दात प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, इंडिया आघाडीतील सर्वच घटक पक्षांनी जागावाटप करताना काळीज घेणे गरजेचे आहे. लोकसभा जागावाटपाच्या दृष्टीने शुक्रवारी (उद्या) राज्यातील नेते आणि पक्षाचे वरिष्ठ यांच्यात दिल्ली येथे बैठक पार पडले. या बैठकीत काँग्रेस महाराष्ट्रात किती आणि कोणत्या जागा लढेल याबाबत विचारविनीमय होईल. त्यानंतर महाविकासआघाडीच्या समन्वय समितीची बैठकही दिल्लीतील सदस्यांसोबत होईल. या बैठकीत जागावाटपाबद्दल चर्चा होईल. भाजपला रोखायचे तर सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येऊन लढणे आवश्यक असल्याची भावना पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. (हेही वाचा, Another Split in MVA?: 'महाविकास आघाडी मध्ये फेब्रुवारी महिन्यात अजून एक राजकीय भूकंप'- भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा सूतोवाच)

16-16-16 फॉर्म्युला?

दरम्यान, महाविकासआघाडीमध्ये कोणी कितीही दावे प्रतिदावे केले तरी ते सर्व केवळ एकमेकांवर दबाव टाकण्यासाठी केले जात आहेत. महाराष्ट्रातील लोकसभेच्या एकूण जागांचा विचार करता सर्व जण मिळून 16-16 फॉर्म्युल्यावर काम करतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राज्यात लोकसभेच्या एकूण जागा आहेत 48 त्यापैकी तिन घटक पक्ष महाविकासआघाडीत आहेत. त्यामुळे जर हे सर्वजण प्रत्येकी 16 जागांवर लढले तर सर्वांनाच समान जागा वाट्याला येतात. त्यामुळे कोणवरही अन्याय झाल्याची भावना निर्मण होणार नाही. त्यामुळे सर्वांसाठी असाच काहीसा तोडगा काढला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.