Another Split in MVA?: 'महाविकास आघाडी मध्ये फेब्रुवारी महिन्यात अजून एक राजकीय भूकंप'- भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा सूतोवाच
Chandrashekhar Bawankule. (Photo Credits: Twitter)

भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(BJP state unit chief Chandrashekhar Bawankule) यांनी महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) मध्ये पुन्हा फूटीचे संकेत दिले आहेत. काल 22 डिसेंबर दिवशी पुण्यात एका पुस्तक महोत्सवामध्ये बोलताना बावनकुळे यांनी फेब्रुवारी महिन्यात ठाकरे गट, शरद पवार गट आणि कॉंग्रेस मधील काही नेते भाजपामध्ये येणार असल्याचं विधान केलं आहे. 'ज्यांना पक्षात सहभागी व्हायचं आहे त्यांच्या स्वागताला आम्ही तयार आहोत' असं त्यांनी म्हटलं आहे.

मराठा आरक्षण सरकार कडून एकदा पास झालं की ते सार्‍या चाचण्यांमधून सहीसलामत बाहेर पडावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत. "Gokhale Institute of Economics and Politics कडे आता सर्व्हे करण्याचं काम दिलं आहे. त्यांच्याकडून मराठा समाजाच्या मागासपणाचा शोध सउरू आहे. त्यांच्याकडून प्रामाणिकपणे केले जाईल अशी अपेक्षा देखील व्यक्त करण्यात आले आहेत.

जो कोणी भाजपची पक्ष आणि विचारसरणी पाळण्यास तयार असेल त्याचे पक्षात स्वागत केले जाईल. "आम्ही त्यांना पक्षाच्या चिन्हासह भाजपचा स्कार्फ देऊ." असं ते म्हणाले आहेत. नक्की वाचा: Sunil Kedar Found Guilty In NDCCB Scam: नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणात काँग्रेस आमदार सुनील केदार दोषी .

बावनकुळे यांनी 31 डिसेंबरला रात्रभर दारूविक्रीला परवानगी देण्याच्या राज्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. या निर्णयामुळे काळाबाजार कमी होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.