स्वत:ला मोदीभक्त म्हणवून घेणाऱ्यांचेच मेंदू सडलेले; सामना अग्रलेखातून शिवसेनेची भाजपवर टीका
Sanjay Raut | Photo Credit :- Facebook

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना विषाणूने (Coronavirus) थैमान घातले आहे. भारतात सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्याने 200 चा आकडा ओलंडला आहे. महाराष्ट्रातील इस्लामपुर (Islampur) येथे कोरोना अधिक संकट उद्भवले आहे. इस्लामपुरात अनेकांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर असताना राज्याचे राजकारण तापल्याचे चिन्ह दिसू लागली आहेत. सध्या भारतात संचारबंदी लागू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांना अनेकांनी पाठिंबा दर्शवला आहे. यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांचाही समावेश आहे. मात्र, इस्लापूरातील भाजीवाल्यांनी नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात केलेले विधानाने सर्वांचे लक्ष केंद्रीत करुन घेतले आहे. स्वत:ला मोदी भक्त म्हणवून घेणाऱ्यांचे मेंदू सडले आहेत, असे विधान चवचाल भाजवाल्यांनी केले आहे. जर हे विधान मोदींच्या कानावर गेले तर, मोदीच अशा भंपक मंडळींच्या बाबतीत कठोर निर्णय घेतील, असे म्हणत शिवसेनेने (Shiv Sena) सामना अग्रलेखातून (Saamna Editorial) भाजपावर टीकास्त्र सोडले आहे.

सामना अग्रलेखात काय म्हटले आहे?

देशभरात कोरोनाचा हैदोस सुरू असताना राजकारणी लोक तोंडास येईल ते बोलत आहेत. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे पंचवीसच्यावर कोरोनाग्रस्त सापडले आहेत. त्याचे खापर भाजप प्रवक्त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्यांवर फोडले आहे. देशभरातला लॉकडाउन आधीच जाहीर करायला हवा होता. रात्री 8 वाजता जाहीर करायला लॉकडाउन म्हणजे नोटाबंदी नव्हे, असे जयंत पाटील म्हणाले होते. अर्थात, जयंत पाटील हे फक्त राज्याचे मंत्री नाहीत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आहेत. त्यांनी त्यांचे मत मांडले. यावर भाजपला इतक्या मिरच्या झोंबायचे कारण काय? म्हणजे ज्यांनी ज्यांनी या काळात मोदींवर टीका केली त्या प्रत्येकाच्या गावात, घरात, जिल्ह्यांमध्ये कोरोना घुसू द्या व बळी जाऊ द्या असे भाजपच्या प्रवक्त्यांना वाटत असावे.

मोदींवर टीका करण्याची शिक्षा मृत्युदंडाच्या रूपाने मिळावी असेही बहुधा त्यांचे म्हणणे असावे. देशातील वातावरण काय आहे आणि हे लोक काय पद्धतीने अकलेचे तारे तोडत आहेत? मोदी हे विष्णूचे तेरावे की चौदावे अवतार आहेत अशा प्रकारची मुक्ताफळे उधळणाऱ्यांनीच महाराष्ट्राला हा कोरोनाचा शाप दिला आहे, असे उद्या कोणी म्हटले तर? इस्लामपुरातील कोरोना संक्रमणाची कारणे समोर आली आहेत. हज यात्रेला गेलेले तीन-चार लोक इस्लामपुरातील आपल्या घरी पोचले व हे लोक तीर्थयात्रेवरून परतले म्हणून त्यांच्या आगत-स्वागताचे, गळाभेटीचे कार्यक्रम पार पडले. त्यातून कोरोनाने इस्लामपूरला विळखा घातला हे सत्य आहे. काल दिल्लीत एका दिवसात कोरोनाच्या 29 रुग्णांची भर पडली. दिल्लीत तर मोदींवर कोणीच टीका केली नव्हती. फडणवीस-गडकरींच्या नागपुरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 20 वर गेला आहे. त्या शहरातही कोणी पंतप्रधान मोदींवर टीका केल्याचे दिसत नाही. उलट उत्तर प्रदेश, भोपाळ, गुरगावात भाजपचे राज्य आहे आणि तेथे रोजच कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. मोदींवर टीका न करणाऱ्या राज्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह वाढत असतील तर तो मोदींच्या ‘देवत्वा’चा पराभव आहे, हे इस्लामपूरवाल्यांना समजले पाहिजे.

जगभरात कोरोनाबाधीतांची संख्या 6 लाख 97 हजार 244 वर पोहचली आहे. यांपैकी 32 हजार 257 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 45 हजार 696 रुग्ण बरे झाल्याची माहिती समोर आली आहे. आता भारतही कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकत चालला असल्याची चिन्ह दिसू लागली आहे. भारतात आतापर्यंत एकूण 1 हजार 108 कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यांपैकी 42 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 101 लोक बरे झाले आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या 225 वर पोहचली आहे. यात 8 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 35 रुग्ण कोरोना विषाणूच्या जाळ्यातून बाहेर आल्याचे समजत आहे.