![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2021/04/Sanjay-Raut-Varsha-Raut--380x214.jpg)
शिवसेना (Shiv Sena ) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Sanjay Raut) यांची कोरोना व्हायरस (Coronavirus) चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे वृत्त आहे. पाठिमागील काही दिवसांपासू त्यांना कोरोना व्हायरस संसर्गाची लक्षणे दिसत होती. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. चाचणीतील अहवाल पॉझिटीव्ह आल्याने वर्षा राऊत यांना कोरोना संसर्ग (Varsha Raut Infected With Coronavirus) झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांच्यासह वर्षा राऊत यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करावी लागणार आहे.
कोरोना संक्रमित व्यक्तीला दिसणारी सर्दी, खोकला, ताप अशी सर्व लक्षणे वर्षा राऊत यांना दिसत होती. त्यामुळे त्यांची चाचणी करण्यात आली. ही चाचणी सकारात्मक आली. आता त्यांना मुंबई येथील फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, संजय राऊत यांच्या कुटुंबीयातील प्रमुख सदस्याला कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. त्यामुळे संजय राऊत यांनाही कोरोना चाचणी करावी लागणार आहे. संजय राऊत यांना कोरोनाची कोणतीही लक्षणं अद्याप तरी दिसली नाहीत. परंतू, राऊत यांनी ब्रिच कँडी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची कालच (3 मार्च) भेट घेतली होती. त्यामुळे अनेकांकडून काळजी व्यक्त केली जाता आहे.
संजय राऊत हे शिवसेना खासदार आहेत. नुकतीच त्यांच्याकडे शिवसेना मुख्य प्रवक्ते म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर वर्षा राऊत या मध्यंतरी जोरदार चर्चेत आल्या होत्या. पीएमसी बँक कथीत गैरव्यवहार प्रकरणात त्यांना ईडीने नोटीस पाठवली होती.