भावना गवळी (Photo Credits-Facebook)

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी शिवसेना खासदार भावना गवळी (Bhavana Gawli) यांना ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. भावना गवळी या महाराष्ट्रातील यवतमाळ-वाशिम येथील खासदार आहेत. यापूर्वी ईडीने मंगळारी एक मोठी कार्यवाही करत भावना गवळी यांच्या कंपनीचे डायरेक्टर आणि निकटवर्तीय सईद खान यांना अटक केली आहे. या दोघांना येत्या 1 ऑक्टोंबर पर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.(Shiv Sena MLA Suhas Kande यांना अंडरवर्ल्डकडून धमकीचा कॉल; छोटा राजन याचा पुतण्या असल्याचा आरोपीचा दावा; गुन्हा दाखल)

सईद खान यांना PMLA नियमांअंतर्गत अटक करण्यात आली आहे. अटक केल्यानंतर सईद खान यांना स्पेशल पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने या प्रकरणी पुढील तपासासाठी त्यांना ईडीच्या ताब्यात दिले आहे.

मंगळवारी ईडीने पीएमएलए न्यायालयाला सांगितले की, गवळी यांनी फसवणूक करून सईद खानच्या माध्यमातून ट्रस्टला त्याच्या खाजगी कंपनीमध्ये 18 कोटी रुपयांचा गैरवापर केला. जवळजवळ एका महिन्यापूर्वी ईडीने भावना गवळी यांच्या 5 ठिकाणी छापेमारी केली होती. ईडी ची ही छापेमारी 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या आरोपावरुन करण्यात आली होती.(उद्धव ठाकरे यांनी सरकारमध्ये घेतल्यने मेलेले काँग्रेसवाले जिवंत झाले- शिवसेना समर्थक आमदार)

भाजप नेते किरिट सोमय्या यांनी आरोप लावला की, भावना गवळी यांनी बँका आणि अन्य संस्थानमधून 100 कोटी रुपये घेतले आणि त्याचा बेकायदेशीर वापर केला. तसेच 55 कोटींच्या कारखान्यांची खरेदी 25 कोटी रुपयात केली. परंतु भावना गवळी यांनी ईडीच्या छापेमारीबद्दल आपली प्रतिक्रिया देत असे म्हटले की, कोणत्याही नोटीस शिवास त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. याआधी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांची सुद्धा ईडी कडून आठ तास चौकशी केली गेली. त्यांनी चौकशी नंतर पत्रकारांना म्हटले की, ईडीच्या चौकशीत पूर्णपणे त्यांची मदत केली आहे.