मी पक्षादेश पाळतो, दिवाकर रावते यांच्याकडून नाराज असल्याच्या चर्चांना पूर्णविराम
Diwakar Raote (Photo Credit: ANI)

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार (Maha Vikas Aghadi) स्थापन झाल्यानंतर अनेक दिवस मंत्रिमंडळ विस्ताराला (Cabinet Expansion) मुहूर्त सापडला नव्हता. अखेर 30 डिसेंबर रोजी महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त सापडला. महाविकास आघाडीतील 26 आमदारांनी कॅबिनेट तर, 10 आमदारांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात दिवाकर रावते (Diwakar Raote) यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे ते नाराज आहेत, अशा अनेक चर्चा रंगू लागल्या होती. यावर दिवाकर रावते यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवत, या चर्चांवर पूर्णविराम लावला आहे. मी एकनिष्ठ शिवसैनिक आहे. तसेच पक्षाच्या प्रत्येक आदेशांचे मी पालन करतो, असे दिवाकर रावते म्हणाले आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा अनेक राजकीय नाट्य पाहायला मिळाले. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार येईल अशी शक्यता वक्त केली जात होती. पंरतु, मुख्यमंत्रीच्या पदावरुन दोन्ही पक्षात वाद निर्माण होऊन अखेर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. शिवसेना आणि काँग्रेस परस्पर विचारधारेचे असून महाविकास आघाडीचे सरकार जात काळ टिकणार नाही, असे मत विरोधीपक्षातील काही नेत्यांनी व्यक्त केले होते. यातच महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केल्यानंतर 30 नोव्हेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला होता. दरम्यान, दिवाकर रावते यांच्यासह अनेक नेते नाराज असल्याची चर्चा रंगली होती. यावर दिवाकर रावते म्हणाले की, मी एकनिष्ठ शिवसैनिक आहे आणि मी नेहमीच पक्षासोबत राहील. मी माझ्या पक्षाच्या आदेशांचे पालन करतो. ज्यावेळी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला , तेव्हा मी तिथेच होतो. यामुळे मी नाराज असल्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असे दिवाकर रावते म्हणाले आहेत. हे देखील वाचा- महाविकास आघाडी सरकारच्या खातेवाटपा पूर्वी सरकारी बंगल्यांचे वाटप जाहीर; पहा आदित्य ठाकरे ते आदिती तटकरे यांना कुठे मिळाले निवासस्थान?

एएनआयचे ट्वीट-

महायुतीच्या सरकारमध्ये शिवसेना पक्षाने दिवाकर रावते, सुभाष देसाई, रामदास कदम, दीपक सावंत, तानाजी सावंत अशा विधान परिषदेवरील आमदारांना महत्त्वाची खाती दिली होती. मात्र, यावेळी शिवसेनेने मंत्रिमंडळ विस्तारात दिवाकर रावते, रामदास कदम यांसारख्या विधान परिषदेतील ज्येष्ठ नेत्यांना व माजी मंत्र्यांना कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाही. महाविकास आघाडीचे शिल्पकार खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनाही मंत्रीपद देण्यात आले नाही.