Cabinet Ministers | Photo Credits: Twitter

ठाकरे सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता खातेवाटप अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र मागील दोन दिवसांपासून खातेवाटपावरून देखील महाविकास आघाडीमधील शिवसेना, कॉंग्रेस आणि एनसीपीमध्ये चर्चा सुरू होत्या. सध्या अंतिम टप्प्यात आलेले खातेवाटप आज संध्याकाळ पर्यंत जाहीर केले जाईल मात्र त्यापूर्वी कॅबिनेट मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांच्या बंगल्याचं वाटप करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देवगिरी, अशोक चव्हाण यांना मेघदूत बंगला मिळाला आहे. तर आदित्य ठाकरे यांना A 6 हा बंगला मिळाला आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यापूर्वीच 'वर्षा' बंगला मिळाला आहे. Maharashtra Cabinet Portfolio Allocation:अजित पवार यांना 'अर्थ' तर आदित्य ठाकरे यांच्याकडे 'पर्यावरण'? पाहा महाविकास आघाडी सरकारच्या खातेवाटपाची संभाव्य यादी!

 

सरकारी बंगल्यांचे वाटप कसे?

दिलीप वळसे पाटील यांना शिवगीरी, अनिल देशमुख यांना ज्ञानेश्वरी, डॉ. राजेंद्र शिंगणे-सातपुडा आणि राजेश टोपे यांना जेतवन हे बंगला मिळाला आहे. बच्चू कडू यांना रॉकिहिल टॉवर 1202, विश्वजीत कदम यांना निलांबरी 302, सतेज पाटील यांना सुरुची-3, आदिती तटकरे यांना सुनिती -10 हे निवासस्थान मिळालं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार विधान भवन प्रांगणात (30 डिसेंबर 2019) दुपारी पार पडला. या विस्तारानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीनही पक्षांमध्ये जोरदार नाराजी पाहायला मिळाली आहे.